‘The Kashmir Files टॅक्स फ्री केला मग आमचा Jhund का नाही?’; निर्मात्यांचा सवाल

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रेक्षक-समीक्षकांची मनं जिंकली आहेत. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची मन हेलावणारी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री घोषित करण्यात आला.

'The Kashmir Files टॅक्स फ्री केला मग आमचा Jhund का नाही?'; निर्मात्यांचा सवाल
The Kashmir Files and JhundImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 5:24 PM

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटाने प्रेक्षक-समीक्षकांची मनं जिंकली आहेत. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची मन हेलावणारी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. देशातील काही राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री घोषित करण्यात आला. मात्र यामुळे गोंधळात पडल्याची भावना ‘झुंड’ (Jhund) या चित्रपटाच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ (Jhund producer) यांनी व्यक्त केली. द काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री केला तर आमचा झुंड का नाही, असा सवाल त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. ‘झुंड’ला केवळ प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही तर या चित्रपटाचा विषय हा देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. याविषयी फेसबुकवर त्यांनी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यांमध्ये द काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री घोषित करण्यात आला आहे.

झुंड टॅक्स फ्री का नाही?

4 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. झुंडनंतर आठवडाभराने विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला. या चित्रपटाला केंद्र आणि राज्य सरकारकडून साथ मिळाली आणि बऱ्याच राज्यांमध्ये त्याला करमुक्त करण्यात आलं. झुंडच्या निर्मात्या सविता राज हिरेमठ यांनी फेसबुकवर पोस्ट लिहित यामुळे संभ्रम निर्माण झाल्याचं म्हटलंय. द काश्मीर फाईल्सप्रमाणेच झुंडसुद्धा महत्त्वपूर्ण चित्रपट आहे, असं त्या म्हणाल्या.

सविता यांची फेसबुक पोस्ट-

‘मी नुकताच द काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहिला आणि त्यामध्ये दाखवण्यात आलेली काश्मिरी पंडितांची व्यथा ही हृदयद्रावक आहे. या कथेला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. पण झुंडची निर्माती म्हणून माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. झुंडसुद्धा महत्त्वपूर्ण चित्रपट आहे आणि या चित्रपटातील संदेशाला लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मला हे जाणून घ्यायचं आहे की सरकार कोणत्या निकषांवर चित्रपटांना करमुक्त करण्यास निवडते, त्याला सोशल मीडियावर प्रमोट करते आणि कार्यालयांना चित्रपट दाखवण्यास किंवा त्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्यास सांगून त्याचं समर्थन करते. झुंड या चित्रपटाचाही विषय आपल्या देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. झुंड हा चित्रपट केवळ जात आणि आर्थिक विषमतेबद्दल बोलत नाही, तर समाजातील खालच्या स्तरातील लोकांना यशाचा मार्ग शोधण्यास प्रेरणा देतो’, असं सविता यांनी लिहिलं.

‘झुंड’बद्दल..

नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’बद्दल..

1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांच्यासह इतरही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.

हेही वाचा:

‘जय संतोषी माँ’बाबत जे घडलं तेच 47 वर्षांनंतर The Kashmir Files बाबत घडतंय; पुन्हा घडणार इतिहास?

Video: मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलं असं काही… जे ऐकून तुमचाही ऊर अभिमानाने भरून येईल!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.