लग्नाचं नातं टिकवण्यासाठी समंथा अक्किनेनी मनोरंजन विश्वाचा निरोप घेणार? जाणून घ्या नेमकं काय म्हणाली अभिनेत्री…

काही काळापूर्वी दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni ) सोशल मीडियावरून 'अक्किनेनी' हे आडनाव काढून टाकले होते.  नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते. मात्र आता समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

लग्नाचं नातं टिकवण्यासाठी समंथा अक्किनेनी मनोरंजन विश्वाचा निरोप घेणार? जाणून घ्या नेमकं काय म्हणाली अभिनेत्री…
समंथा अक्किनेनी
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 4:12 PM

मुंबई : काही काळापूर्वी दक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनीने (Samantha Akkineni ) सोशल मीडियावरून ‘अक्किनेनी’ हे आडनाव काढून टाकले होते.  नागा चैतन्यशी लग्नानंतर अभिनेत्रीने तिच्या नावापुढे अक्किनेनी हे आडनाव जोडले होते. मात्र आता समंथा आणि तिचा पती नागा चैतन्य यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळेच तिने आपल्या नावापुढील आडनाव काढून टाकले आहे, असे म्हटले जात होते. परंतु, आता या संपूर्ण प्रकरणावर प्रथमच समंथाने योग्य उत्तर दिले आहे.

नात्यावर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या लोकांना दिले उत्तर

अलीकडेच, समंथाने एका मुलाखतीत शेवटी त्यांच्या नातेसंबंधावर उद्भवलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली आहेत. लोकप्रिय होस्ट अनुपमा चोप्राच्या शोमध्ये जेव्हा तिला विचारण्यात आले की, तिच्या पतीबरोबरचे तिचे संबंध बिघडले आहेत, अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे, यावर ती आतापर्यंत गप्प का होती? यावर उत्तर देताना ती म्हणाली की, मी सर्व वाद आणि ट्रोल्सची उत्तरे तेव्हाच देईन, जेव्हा मला स्वतःला तसे वाटेल.

नाव का बदलले?

जेव्हा अभिनेत्रीला तिचे अक्कीनेनी आडनाव काढण्याचे कारण विचारण्यात आले तेव्हा नागार्जुनची सून म्हणाली,’मला या सर्व गोष्टींवर आता प्रतिक्रिया द्यायची नाही. मला वाद आवडत नाही. जसे अनेक लोक आपले विचार व्यक्त करण्यास मोकळे आहेत, त्याचप्रमाणे मीही माझे विचार व्यक्त करण्यास मोकळे आहे.’

समंथा यांनी ट्रोल्सना उत्तर दिले, पण त्यांच्या नात्याबद्दल काहीही स्पष्ट केले नाही. समंथा आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांना बराच काळ डेट केल्यानंतर 2017 मध्ये लग्न केले. दोघे 2010 मध्ये ‘ये माया चेसावे’ चित्रपटात पहिल्यांदा पडद्यावर दिसले होते. दोघांच्या चाहत्यांना त्यांना नेहमी पडद्यावर एकत्र पाहणे आवडते.

अभिनयापासून दूर जाणार?

टॉलिवूडची नंबर 1 स्टार सामंथा अक्किनेनी अभिनय विश्वावर वर्षानुवर्षे राज्य करत आहे. साउथ सिने वर्ल्डमध्ये सामंथा अक्किनेनीचे प्रचंड चाहते आहेत. ती बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. साऊथ सिने स्टार सामंथा अक्किनेनीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ला चाहत्यांचा आणि समीक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मुलाखतीदरम्यान, समंथा म्हणाली की, तिला आता अभिनयापासून काही काळ विश्रांती घ्यायची आहे. तिने सांगितले की तिच्या 10-11 वर्षांच्या कारकिर्दीत ती सतत काम करत आहे. लग्नानंतरही तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला नाही आणि बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये व्यस्त राहिली. अभिनेत्रीने सांगितले की, आता तिला एक किंवा दोन वर्षांचा ब्रेक घ्यायचा आहे. त्यानंतरच ती पुन्हा चित्रपटात काम सुरू करेल. अर्थातच हा ब्रेक समंथासाठी लहान असेल, पण तिच्या चाहत्यांसाठी हा ब्रेक खूप मोठा असणार आहे. समंथाकडे सध्या दोन तामिळ चित्रपट आहेत. यापैकी एकामध्ये ती विजय सेतुपती आणि नयनतारासोबत दिसणार आहे, तर दुसरा हॉरर थ्रिलर चित्रपट आहे.

हेही वाचा :

‘राधे-राधे’ म्हणत स्वप्नील जोशीनं शेअर केले थ्रो बॅक फोटो, श्रीकृष्णाचं हे सुंदर रुप पाहाच

सोनम कपूरला मोठा धक्का, संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता?

दिव्या अग्रवालला अभिनेत्री सनी लिओनीची साथ, पाहा खास फोटो

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.