Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वेलमधून आर्यन खान करणार डेब्यू? काय आहे Viral फोटोमागचं सत्य?

मोठ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास शाहरुख खानचा मुलगा सज्ज?

'या' सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वेलमधून आर्यन खान करणार डेब्यू? काय आहे Viral फोटोमागचं सत्य?
Aryan KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 12:53 PM

बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा इंडस्ट्रीत पदार्पण कधी करणार यावरून विविध चर्चा रंगल्या आहेत. आर्यनला रुपेरी पडद्यावर लाँच करण्यासाठी बरेच निर्माते-दिग्दर्शक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आर्यन त्याच्या करिअरची सुरुवात कधी करणार, हे अद्याप चाहत्यांना समजू शकलं नाही. अशातच आर्यनच्या एका फॅन पेजवर त्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरून आर्यन लवकरच एका मोठ्या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये झळकणार असल्याची चर्चा सुरू झाली.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये शाहरुखचा मुलगा आर्यन हा ‘ब्रह्मास्त्र 2’मध्ये ‘वानरास्त्र’च्या रुपात दिसणार असल्याचं कळतंय. ‘ब्रह्मास्त्र 2’च्या पोस्टरमध्ये आर्यनला ‘वानरास्त्र’च्या अवतारात दाखवलं गेलंय. यावरूनच त्याच्या डेब्युविषयी जोरदार चर्चा रंगतेय.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा बिग बजेट चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्यासोबतच चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर अभिनेता शाहरुख खान हा चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला.

‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पहिल्या भागात शाहरुखने कॅमिओ केल्यानंतर आता दुसऱ्या भागात त्याचा मुलगा आर्यन पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. चाहत्यांनी त्याच्या या पोस्टरबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. मात्र या व्हायरल फोटोमागचं सत्य वेगळंच आहे.

आर्यनच्या फॅनपेजवर पोस्ट केलेला हा फोटो ‘ब्रह्मास्त्र 2’चा पोस्टर नाहीये. एका युजरने आर्यनचा फोटो एडिट करून हा पोस्टर बनवला आहे. त्यावर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखसुद्धा खोटी देण्यात आली आहे. आर्यनच्या पदार्पणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.