Video | नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या दुबईच्या घरात अडकली महिला कामगार, ढसाढसा रडत…
इतकेच नाही तर बेडरूममध्ये झोपण्यासही मनाई करून बेडरूम लाॅक करण्यात आली. आलिया सिद्दीकी हिने अंधेरी न्यायालयात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.
मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. नवाजुद्दीन सिद्दीकी याची पत्नी आलिया हिने अनेक गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याच्या आईने देखील आलियावर काही आरोप केले. आता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियामधील वाद थेट कोर्टात जाऊन पोहचला आहे. आलिया सिद्दीकी हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Video) शेअर करत आपल्यावर कशाप्रकारे अत्याचार केले जात होते याची माहिती दिली. दुसरीकडे आलिया सिद्दीकी हिच्याविरोधात नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आईने तक्रार दाखल केलीये. संपत्तीचा वाद यांच्यामध्ये सुरू आहे. आलिया हिच्या वकिलाने म्हटले होते की, आलिया यांना बाथरुम वापरण्यापासून रोखण्यात आले. इतकेच नाही तर बेडरूममध्ये झोपण्यासही मनाई करून बेडरूम लाॅक करण्यात आली. आलिया सिद्दीकी हिने अंधेरी न्यायालयात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे.
आलिया सिद्दीकी हिच्या तक्रारीनंतर न्यायालयाने या प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दीकी याला नोटीस पाठवली होती. आलियाच्या तक्रारीनंतर नवाजुद्दीन याला त्याच्या कुटुंबियांसोबत अंधेरी न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी हजर राहयचे होते. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकी किंवा त्याच्या कुटुंबियांपैकी कोणीच हजर झाले नव्हते.
हे सर्व प्रकरण सुरू असतानाच आता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणीमध्ये वाढ होणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताय. विशेष म्हणजे हा व्हिडीओ आलिया सिद्दीकी हिच्या वकिलाने शेअर केला आहे. रिजवान सिद्दीकीने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
रिजवान सिद्दीकी यांनी दुबईमध्ये अडकून पडलेल्या सपनाच्या सुटकेची मागणी भारत सरकारच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या दुबईतील घरामध्ये काम करणारी सपना ही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आपण इथे अडकल्याचे म्हणताना सपना दिसत आहे आणि यावेळी ती ढसाढसा रडत देखील आहे.
The video & my statement speaks for itself. Govt authorities are requested to urgently rescue the house help of @Nawazuddin_S from Dubai where the girl is in a state of Solitary Confinement@cgidubai @UAEembassyIndia @LabourMinistry @HRDMinistry@MEAIndia @CPVIndia @OIA_MEA pic.twitter.com/EyQ8DiHPG2
— Advocate Rizwan Siddiquee (@RizwanSiddiquee) February 19, 2023
व्हिडीओमध्ये सपना म्हणत आहे की, मी नवाजुद्दीन सरांच्या घरी अडकले आहे…मॅडम गेल्यावर सरांनी मला व्हिसा लावून दिला. माझ्या पगारातून व्हिसाचे पैसे कापले जात आहेत…मला दोन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे मला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. दीदी गेली..तिलाही खूप अडचणी येत होत्या…
सध्या मी इथे एकटीच आहे. माझ्याकडे खायलाही पैसे नाहीत… मी तुम्हाला विनंती करते की मला येथून बाहेर काढा आणि मला माझा पगार हवा आहे… मला माझ्या घरी भारतात जायचे आहे. मला जाण्यासाठी तिकीट आणि पगार हवा आहे…आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.