World Music Day 2021 | बॉलिवूडच्या ‘या’ दमदार गाण्यांनी केले प्रेक्षकांच्या मनावर राज्य, आवर्जून ऐका ‘ही’ लोकप्रिय गाणी!
आज म्हणजे 21 जून रोजी जगभरात ‘जागतिक संगीत दिन’ साजरा केला जातो. एक काळ असा होता की, गाणी ऐकण्यासाठी लोकांना रेडिओ किंवा टीव्हीवर चित्रहार किंवा रंगोलीची प्रतीक्षा करावी लागत असे. परंतु, आज इंटरनेटच्या जगात संगीत प्रेमी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन त्यांची आवडती गाणी ऐकू शकतात.
मुंबई : आज म्हणजे 21 जून रोजी जगभरात ‘जागतिक संगीत दिन’ साजरा केला जातो. एक काळ असा होता की, गाणी ऐकण्यासाठी लोकांना रेडिओ किंवा टीव्हीवर चित्रहार किंवा रंगोलीची प्रतीक्षा करावी लागत असे. परंतु, आज इंटरनेटच्या जगात संगीत प्रेमी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन त्यांची आवडती गाणी ऐकू शकतात (World Music Day 2021 must listen this Bollywood famous songs).
सद्य काळात केवळ चित्रपटातील गाणीच नव्हे, तर संगीत अल्बमची गाणीही चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. प्रत्येक दशकात संगीतातील वेगवेगळे बदल चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत गेले. आज या खास निमित्ताने आपण अशीच काही गाणी ऐकणार आहोत ज्यांनी श्रोत्यांच्या मनावर नेहमीच राज्य केलं
नक्की ऐका ‘ही’ गाणी!
2019 मध्ये रिलीज झालेला ‘केसरी’ हा चित्रपट सारागढीच्या युद्धावर आधारित होता. एकीकडे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडक दिली असतानाच, चित्रपटाचे ‘माही वे’ हे गाणे बरेच लोकप्रिय झाले.
1964च्या ‘वो कौन थी’ या चित्रपटात संगीताचे सुमधुर स्वर ऐकायला मिळाले. परंतु, या चित्रपटातील ‘लग जा गले’ हे गाणे आजही चाहत्यांच्या ओठांवर आहे.
राज कपूर यांची एक विशेष गोष्ट म्हणजे ते त्यांच्या चित्रपटांमध्ये उत्कृष्ट संगीत वापरत, त्यांनी अशी गाणी सादर केली, जी आजपर्यंतच्या चाहत्यांच्या आवडीची आहेत. यातीलच एक ‘किसीकी मुस्कुराहटो पें’ हे गाणी आजही लोकप्रिय आहे.
राजेश खन्ना यांच्या कारकिर्दीतील ‘आनंद’ हा शानदार चित्रपट आणि त्यातील ‘कही दूर जब दिन ढल जाये’ ही गाणे ऐकल्यानंतर चाहते अधिक भावूक झाले.
1958मध्ये ‘मधुमती’ या चित्रपटाचे संगीत प्रेक्षकांना खूप आवडले होते, या चित्रपटाचे ‘सुहाना सफर’ हे गाणे खूप गाजले.
शाहरुख खानने बरीच उत्तम गाणी चित्रित केली आहेत. पण जेव्हा शाहरुखचे ‘चल छैया छैया’ हे गाणे वाजू लागते तेव्हा सगळ्यांचे पाय थिरकायला लागतात.
गझल सम्राट जगजितसिंग यांचे कोई फिरयाद हे गाणे देखील चाहत्यांच्या मनाला भावले होते.
90च्या दशकात आलेल्या ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील प्रत्येक गाणे चाहत्यांमध्ये सुपरहिट ठरले होते. चित्रपटाची गाणी अद्याप विवाहसोहळ्यांमध्ये वाजवली जातात.
‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या अनोख्या गाण्यांनी चित्रपटाला आणखी दमदार बनवले होते.
इमरान हाश्मी याचे नुकतेच प्रदर्शित झालेले गाणे ‘लुट गये’ सुपरडुपर हिट ठरले.
जेव्हा जेव्हा आपण कोणत्याही दु:ख किंवा संकटात असतो, तेव्हा केवळ संगीत आपल्याला यातून बाहेर निघण्यास मदत करते. संगीत प्रत्येक परिस्थितीत माणसाला जोडतो.
(World Music Day 2021 must listen this Bollywood famous songs)
हेही वाचा :
Khatron Ke Khiladi 11 : अभिनव शुक्लाची शोमधून एक्झिट? टॉप 4 मध्येही स्थान मिळवता आलं नाही…