जागतिक चित्रपट क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम, 30 मिनिटांचा ट्रेलर स्क्रीनिंग शो पाहता येणार फक्त 1 रूपयामध्ये

चित्रपट प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. चित्रपटाच्या ट्रेलर शोचा जबरदस्त असा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. चित्रपट कोणताही असो प्रेक्षकांंमध्ये त्याचा ट्रेलरबद्दल कायमच एक आतुरता बघायला मिळते. ट्रेलर चित्रपटाची एक झलक प्रेक्षकांना बघायला मिळते.

जागतिक चित्रपट क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच अनोखा आणि कौतुकास्पद उपक्रम, 30 मिनिटांचा ट्रेलर स्क्रीनिंग शो पाहता येणार फक्त 1 रूपयामध्ये
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 6:03 PM

मुंबई : कोणत्याही चित्रपटाचा ट्रेलर असो त्याबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळते. ट्रेलर (Trailer) रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल एक अंदाजा नक्कीच येतो. बऱ्याच वेळा ट्रेलर पाहून चित्रपट बघायचा किंवा नाही हे प्रेक्षक ठरवतात. ट्रेलर कायमच रोमांचक आणि आनंददायी एक अनुभव असतो. ट्रेलरमधूनच आपल्या चित्रपटाच्या कथेविषयी अंदाज येतो. यामुळेच नेहमी चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या (Movie) ट्रेलरबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळते. आता हीच गोष्ट लक्षात घेत पीव्हीआर आयनॉक्स तर्फे प्रेक्षकांना एक मोठे गिफ्ट देण्यात आले आहे.

भारतातील आघाडीच्या फिल्म एक्झिबिटर असलेल्या पीव्हीआर आयनॉक्स तर्फे जगातील पहिला क्युरेटेड ट्रेलर स्क्रीनिंग शो मोठ्या पडद्यावर फक्त आणि फक्त 1 रूपयांत सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 30 मिनिटांच्या स्क्रीनिंगमध्ये आगामी बॉलिवूड, हॉलिवूड आणि प्रादेशिक चित्रपटांचे 10 पेक्षा अधिक ट्रेलर दाखविण्यात येणार आहेत. यामुळे आता प्रेक्षकांमध्ये देखील उत्साह बघायला मिळतोय.

30 मिनिटांचा ट्रेलर शो प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे. नवीन ट्रेलर शो 7 एप्रिलपासून देशभरातील पीव्हीआर आणि आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यात आला असून विशेष म्हणजे याला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय. अवघ्या 1 रूपयांत चित्रपटाचा ट्रेलर शो बघता येत असल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे.

Movie

पीव्हीआर आयनॉक्सचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी यावर मोठे भाष्य करत म्हटले की, अत्यंत उच्च दर्जाची ध्वनी व्यवस्था आणि दृकश्राव्य अनुभवामुळे मोठ्या पडद्यावर ट्रेलर पाहण्याचा अनुभव खास असतो. या शोमुळे चित्रपटाची उत्कंठेत भर पडणार आहे. हा एक नक्कीच चांगला अनुभव असणार आहे.

पुढे गौतम दत्ता म्हणाले, या आमच्या 30 मिनिटांच्या ट्रेलर स्क्रीनिंग शोच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन नक्कीच करणार आहोत. प्रेक्षकांनी आपल्या आवडत्या आगामी चित्रपटाच्या ट्रेलरचा आनंद अत्यंत आरामदायी आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांसोबत घ्यावा. इतेकच नाही तर त्यासाठी प्रेक्षकांनी काही पैसे मोजण्याची देखील अजिबात गरज नाहीये.

असा खास आणि पहिल्यांदा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांना आमच्या चित्रपटगृहात आमंत्रित मी करू इच्छित आहे. आम्ही प्रेक्षकांना आनंददायी अनुभव देण्यासाठी सतत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. ट्रेलरचे शो सर्व प्रमुख चित्रपटगृहात प्राईम टाईम स्लॉटमध्ये दाखविण्यात येणार आहेत. तुमच्या जवळच्या पीव्हीआर आणि आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये पहिला 30 मिनिटांचा ट्रेलर शो नक्की पाहा असेही गौतम दत्ता म्हणाले. पीव्हीआर आणि आयनॉक्सचे संकेतस्थळ किंवा अ‍ॅपद्वारे प्रेक्षक तिकीटे खरेदी करू शकता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.