“बुरखा-हिजाबला माझा विरोधच पण…”, कर्नाटक हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर संतापले

आयेशा सय्यद, मुंबई : कर्नाटक हिजाब प्रकरण (Karnataka Hijab) आता चांगलंच तापलं आहे. मुस्लिम मुली शाळेत हिजाब घालण्यावर ठाम आहेत. तर काही हिंदुत्ववादी गटांनी याला विरोध केला आहे. यावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. साहित्यिक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय, “मी कधीच बुरखा आणि […]

बुरखा-हिजाबला माझा विरोधच पण..., कर्नाटक हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर संतापले
जावेद अख्तर
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 4:37 PM

आयेशा सय्यद, मुंबई : कर्नाटक हिजाब प्रकरण (Karnataka Hijab) आता चांगलंच तापलं आहे. मुस्लिम मुली शाळेत हिजाब घालण्यावर ठाम आहेत. तर काही हिंदुत्ववादी गटांनी याला विरोध केला आहे. यावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. साहित्यिक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय, “मी कधीच बुरखा आणि हिजाबच्या बाजूने नव्हतो. ते परिधान करण्याला माझा आधीही विरोध होता आणि आजही आहे. पण कर्नाटकात लहान मुलींना ज्या प्रकारे धमकावलं जातंय ते संतापजनक आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. ते चुकीचंच आहे” असं म्हणत जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला. जावेद अख्तर त्यांच्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. कर्नाटकात सुरू असलेल्या वादावर जावेद अख्तर यांनी ट्विट केलं त्यावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

जावेद अख्तर यांचं ट्विट ज्येष्ठ साहित्यिक जावेद अख्तर यांनी कर्नाटकात हिजाब आणि बुरख्यावरून सुरू असलेल्या वादावर ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. “बुरखा आणि हिजाब परिधान करण्याला माझा आधीही विरोध होता आणि आजही आहे. पण कर्नाटकात लहान मुलींना ज्या प्रकारे धमकावलं जातंय ते संतापजनक आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही”, असं जावेद अख्तर म्हणालेत.

कमल हसन यांचं मत

कर्नाटकात हिजाब आणि बुरख्यावरून सुरू असलेल्या वादावर अभिनेते कमल हसन यांनी आपलं मत मांडलं आहे.”कर्नाटकात जे घडत आहे ते अतिशय दुःखद आहे. तिथं जे काही चालू आहे ते तामिळनाडूत येऊ नये. अजून काळजी घेणं आवश्यक आहे. सध्या राज्यात तीन दिवस सुट्या असल्याने बुधवारी शांतता होती. बहुतेक शाळांमध्ये ऑनलाइन शिकवलं जातंय. राज्यातील प्राथमिक शाळा पूर्वीप्रमाणेच कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहेत.” , असं कमल हसन म्हणाले आहेत.

हेमा मालिनी यांचं हिजाब प्रकरणी प्रतिक्रिया

हेमा मालिनी यांनी कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया आहे. “शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा”, असं हेमा मालिनी म्हणाल्यात. त्या एएनआयशी बोलत होत्या.

जावेद अख्तर नेहमीच प्रत्येक सामाजिक प्रश्नांवर आपलं मत मांडत असतात. जावेद अख्तर यांच्या लेखणीने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक दर्जेदार गाणी दिली. त्यांना 8 वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 1999 मध्ये साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या गाण्यांसाठी त्यांना 5 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ते राज्यसभेचे खासदारही राहिले आहेत.

संबंधित बातम्या

करोडपती होण्यासाठी सज्ज व्हा!, ‘कोण होणार करोडपती’ चं नवं पर्व 23 फेब्रुवारीपासून ‘सोनी मराठी’वर

A Thursday Trailer : यामी गौतमच्या ‘A Thursday’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट, दोन तासात एक मिलियनहून अधिक views

Sayani Gupta : अभिनेत्री सयानी गुप्ताचा हटके अंदाज, ‘यलो’ लूकची सोशल मीडियावर चर्चा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.