Karthik Aryan | यूट्यूबच्या सीईओने अभिनेता कार्तिक आर्यनचे केले कौतुक!

२०२० हे वर्ष प्रत्येकासाठीच खूप अवघड होते. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Karthik Aryan) लोकांना अचूक माहिती देऊन थोडेसे हसवण्याचा प्रयत्न केला.

Karthik Aryan | यूट्यूबच्या सीईओने अभिनेता कार्तिक आर्यनचे केले कौतुक!
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 6:17 PM

मुंबई : २०२० हे वर्ष प्रत्येकासाठीच खूप अवघड होते. अशा परिस्थितीत बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने (Karthik Aryan) लोकांना अचूक माहिती देऊन थोडेसे हसवण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळात तो आपला चॅट शो कूकी पूछेगा घेऊन आला होता. ज्यामध्ये फ्रंटलाइन वर्क्सवर बोलण्याबरोबरच लोकांना हसवायचा. (YouTube CEO praises actor Karthik Aryan)

कार्तिकच्या कूकी पूछेगा शोने सोशल मीडियावर जोरदार हंगामा केला होता. हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडला होता. कार्तिक व्यतिरिक्त अनेक संगीत कलाकार लोकांचे मनोरंजन करण्यासाठी पुढे आले होते. अशा परिस्थितीत, यूट्यूबने या लोकांच्या कार्याचे कौतुक करण्याचा निर्णय घेतला आहे. यूट्यूबचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुसान वोजसिकी यांनी सोशल मीडियावर कार्तिक आर्यन यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. यूट्यूब इंडिया मधील आर्टिस्ट कंटेंट क्रिएटर, सीईओने प्रथम कार्तिक आर्यनला टॅग केले आहे.

सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या कार्तिकने आपल्या आगामी ‘धमाका’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. कार्तिक राम माधवानीच्या चित्रपटासह थ्रिलर झोनमध्ये पाऊल ठेवण्यासाठी उत्सुक आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलताना, कार्तिक अखेर सारा अली खान सोबत लव आज कालमध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नव्हता. सध्या कार्तिकजवळ बरीच चित्रपट आहेत. भूल भूलैया 2 मध्ये कियारा अडवाणी सोबत तर दोस्ताना 2 मध्ये जाह्नवी कपूरसोबत दिसणार आहे.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉनचा चित्रपट लुका छुपीने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी शानदार अशी कमाई केली होती.  लिव्ह इन रिलेशनशिपच्या मुद्द्यावर बनवलेला चित्रपट कॉमिक अंदाजात प्रेक्षकांसमोर मांडलेला होता.  या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. यामुळेच चित्रपटाने दोन दिवसात 18 कोटी रुपये कमवले होते.

‘लुका छुपी’ने धमाकेदार ओपनिंग करत पहिल्याच दिवशी 8.01 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 10.08 कोटी रुपयांची कमाई होती. दोन दिवसात चित्रपटाने 18.09 कोटी रुपये कमवले होते. सोबतच कार्तिक आर्यनच्या करिअरमधील हा पहिला चित्रपट होता ज्याची ओपनिंग कमाई सर्वात जास्त होती. यापूर्वी 2015 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘प्यार का पंचनामा 2’ ने पहिल्या दिवशी 6.80 कोटी रुपये कमावले होते. तसेच 2018 मध्ये आलेला चित्रपट ‘सोनू की टीटू की स्वीटी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 6.42 कोटी रुपये कमवले होते. असे तीन चित्रपटात आतापर्यंत कार्तिक आर्यनने प्रमुख भूमिकेत काम केले आहे.

संबंधित बातम्या : 

KBC 12 Karamveer Special | ‘रणजितसिंह डिसले आणि ऊषा खरे’ कौन बनेगा करोडपतीमध्ये दिसणार!

OTT Releases This Week | या आठवड्यात मनोरंजनाचा खजिना, पाहा कोणते चित्रपट आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित!

(YouTube CEO praises actor Karthik Aryan)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.