Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonakshi Sinha: अखेर झहीर इक्बालने दिली प्रेमाची कबुली; सोनाक्षी सिन्हाला म्हणाला I Love You

सोनाक्षीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना झहीरने तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. त्यामुळे हे दोघं रिलेशनशिपमध्ये (Relationship) असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय.

Sonakshi Sinha: अखेर झहीर इक्बालने दिली प्रेमाची कबुली; सोनाक्षी सिन्हाला म्हणाला I Love You
Zaheer Iqbal, Sonakshi SinhaImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 07, 2022 | 11:54 AM

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा आहेत. या दोघांनी अद्याप याबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी सोशल मीडियावर ते एकमेकांच्या पोस्टवर मोकळेपणे व्यक्त होताना दिसतात. सोनाक्षीने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना झहीरने तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. त्यामुळे हे दोघं रिलेशनशिपमध्ये (Relationship) असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. 2 जून रोजी सोनाक्षीचा वाढदिवस होता. यानिमित्त झहीरने तिच्यासाठी खास बर्थडे पोस्ट लिहिली आहे.

सोनाक्षीसोबत मस्करी करतानाचा एक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ विमानातील असून त्यात सोनाक्षी बर्गर खाताना दिसतेय. तर झहीर तिला हसवण्याचा प्रयत्न करतोय. या दोघांमधील बाँडींग पाहून नेटकऱ्यांनी रिलेशनशिपबद्दल कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. ‘हॅपी बर्थडे Sonzzz. आय लव्ह यू तुला खूप सारं फूड, फ्लाइट्स आणि लाफ्टर मिळो’, असं कॅप्शन झहीरने या व्हिडीओला दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Zaheer Iqbal (@iamzahero)

याआधीही सोनाक्षीने इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीसोबत फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये सोनाक्षीसोबत असलेला मिस्ट्री मॅन कोण आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्यावेळी उपस्थित केला होता. विशेष म्हणजे तिच्या हातात डायमंडची अंगठी दिसत असल्याने तिने गुपचूप साखरपुडा उरकला की काय, असाही अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला होता. सोनाक्षीने कॅप्शनमध्ये शेवटी EZI असं लिहिल्याने अनेकांनी झहीर इक्बालच्या नावाचा अंदाज वर्तवला होता. ‘EZI म्हणजे झहीर इक्बाल का?’, असा प्रश्न एकाने विचारला होता. तर दुसऱ्याने लिहिलं, ‘EZI: E म्हणजे Engagement, Z म्हणजे Zaheer आणि I म्हणजे Iqbal.’

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षी आणि झहीर या दोघांनीही सलमान खानच्या प्रोजेक्टमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सोनाक्षीने 2020 मध्ये ‘दबंग’ या चित्रपटातून पदार्पण केलं, तर झहीरने 2019 मध्ये ‘नोटबुक’ या चित्रपटातून पदार्पण केलं.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.