वाणी कपूरचा अपघात, अभिनेत्रीच्या गाडीची पोलिसांच्या गाडीला धडक, कशी आहे प्रकृती?

Vaani Kapoor Accident: वाणी कपूरचा अपघात झाल्यामुळे चाहते चिंतेत, अपघातानंतर कशी आहे अभिनेत्रीची प्रकृती? वाणीच्या गाडीची पोलिसांच्या गाडीला धडक

वाणी कपूरचा अपघात, अभिनेत्रीच्या गाडीची पोलिसांच्या गाडीला धडक, कशी आहे प्रकृती?
Follow us
| Updated on: Nov 18, 2024 | 8:27 AM

Vaani Kapoor Accident: सध्या सर्वत्र वाणी कपूर हिची चर्चा रंगली आहे. वाणी कपूर हिचा जयपूर याठिकाणी अपघात झाला आहे. रविवारी अभिनेत्री अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. एका सिनेमाची शुटिंग करत असताना वाणी हिचा अपघात ढाला आहे. वाणी कपूर परकोटा जयपूर येथील बापू बाजारात फिरतानाचे सीन शूट करत होती. तेव्हाच अभिनेत्रीची स्कूटी शेजारी उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीला धडकली.

रिपोर्टनुसार, सिनेमातील एका सीनमध्ये स्कूटीवरून फिरण्याचा सीन आहे. वाणी स्कूटी चालवण्याचा सराव करत होती. तेव्हाच अभिनेत्रीची स्कूटी पोलिसांच्या गाडीला धडकली. अपघात होताच वाणीची टीम घटनास्थळी पोहोचली आणि अभिनेत्रीला वाचवलं. अपघातात वाणीला कोणत्याही प्रकारणी इजा झालेली नाही.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Vaani Kapoor (@vaanikapoor)

सांगायचं झालं तर, वाणी कपूर आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमाचं नाव ‘अबीर गुलाल’ असं आहे. सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान देखील आहे. फवाद सिनेमाच्या शुटिंगसाठी लवकरच जयपूर याठिकाणी येणार आहे. रिपोर्टनुसार, 18 नोव्हेंबर रोजी सिनेमाचे काही सीन्स जयपूर याठिकाणी असलेल्या शिवविलास हॉटेलमध्ये शूट होणार आहेत.

वाणी कपूर हिचा जयपूर शहराशी फार जुनं नातं आहे. ज्या सिनेमातून वाणी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं त्या सिनेमाचं शुटिंग देखील जयपूर याठिकाणी झालं होतं. वाणी कपूर हिच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘शुद्ध देसी रोमान्स’ असं होतं. सिनेमात वाणी हिच्यासोबत अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि दिवंगत अभिनेता सुशांक सिंह राजपूत देखील मुख्य भूमिकेत होते.

View this post on Instagram

A post shared by Vaani Kapoor (@vaanikapoor)

वाणी कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. वाणीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील वाणी कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी वाणी कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.