Payal Ghosh | पायल घोषच्या ‘बिनशर्त’ माफीला उच्च न्यायालयाची मंजुरी, ऋचाकडून ‘मानहानी’ केस रद्द!
बुधवारी (14 ऑक्टोबर) दोघींनीही आपापसांतील वाद सामंजस्याने मिटवल्याची कबुली मुंबई उच्च न्यायालयासमोर दिली आहे.
मुंबई : चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप लावणाऱ्या अभिनेत्री पायल घोषने (Payal Ghosh) अखेर ऋचा चड्ढाची (Richa Chadha) कुठल्याही अटींशिवाय माफी मागितली आहे. तर, पायलला माफ करत ऋचाने तिच्यावर दाखल केलेली मानहानीची केस मागे घेतली आहे. बुधवारी (14 ऑक्टोबर) दोघींनीही आपापसांतील वाद सामंजस्याने मिटवल्याची कबुली मुंबई उच्च न्यायालयासमोर दिली आहे. याआधी न्यायालयाने त्यांना वाद मिटवण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली होती. (Bombay HC accepts unconditional apology by actor Payal Ghosh to Richa Chadha)
We are ready with all your conditions but only you have to write it’s unconditional apology, kids or what.. just to satisfy ego .. Lol..!!
— Payal Ghosh (@iampayalghosh) October 14, 2020
पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर या प्रकरणात ऋचा चड्ढा हिचे नावदेखील घेतले होतते. त्यामुळे ऋचाने (Richa Chadha) पायलविरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी बुधवारी झालेल्या सुनावणीत पायलचे वकील नितीन सातपुते यांनी पायल (Payal Ghosh), ऋचा चड्ढाची माफी मागणार असल्याचे म्हटले होते. त्याप्रमाणे पायलने उच्च न्यायालयसमोर ऋचाची माफी मागितली आहे. तसे, सामंजस्याने हा वाद मिटवला असल्याचे म्हटले आहे.
Actor Richa Chaddha’s defamation case against Payal Ghosh at Bombay High Court withdrawn after both parties signed consent terms.
— ANI (@ANI) October 14, 2020
काय आहे नेमके प्रकरण
पायलने एका मुलाखतीदरम्यान ऋचा चड्ढाचे नाव घेतले होते. पायल म्हणाली होती की, ‘अनुराग कश्यप यांनी मला सांगितले की ऋचासह अनेक अभिनेत्री त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाल्या आहेत’. तसेच ऋचासह माही गिल, हुमा कुरेशी या अभिनेत्रींची नावे घेत, ‘काही नट्या अनुरागसोबत काम करण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात’, असा दावा पायलने केला होता. त्यावरुन ऋचाने पायलला सडेतोड प्रत्युत्तर दिलेच, त्याचबरोबर उच्च न्यायालयात पायलविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता.
ऋचाने पायलला कोर्टात खेचल्यानंतर, सुरुवातीला पायलने हे प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगाकडे नेण्याचा प्रयत्न केला. पायलने त्यावेळी ऋचाची माफी मागण्यास नकार दिला होता. परंतु, न्यायालयासमोर पायलचे काहीही चालले नाही. उलट आज तिला ऋचाची ‘बिनशर्त’ माफी मागावी लागली आहे. (Bombay HC accepts unconditional apology by actor Payal Ghosh to Richa Chadha)
पायल घोषकडून अनुराग कश्यपवर आरोप
‘अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले. त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा. ज्यामुळे या माणसाचे खरे रुप जगासमोर येईल. माझ्या या वक्तव्यामुळे मला धोका होऊन माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा’, असे ट्विट पायल घोषने (Payal Ghosh) काही दिवसांपूर्वी केले होते. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. याशिवाय तिने पोलीस स्थानकात अनुरागविरोधात बलात्कार आणि लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती.
संबंधित बातम्या :
Payal Ghosh | अनुराग विरोधात ठोठावले राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे, पायल घोष दिल्लीला रवाना!
पायल घोषविरोधात रिचा चढ्ढा कोर्टात, ठोकला 1.1 कोटींचा मानहानीचा दावा
Anurag Kashyap | अनुराग कश्यप खोटारडे, त्यांची नार्को टेस्ट करा, पायल घोषची मागणी
(Bombay HC accepts unconditional apology by actor Payal Ghosh to Richa Chadha)