Rhea Chakraborty bail | तब्बल 28 दिवसानंतर रियाची सुटका, भायखळा तुरुंगाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त!
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) जामीन मिळाला आहे. तब्बल 28 दिवसानंतर रिया भायखळा तुरुंगातून बाहेर पडली आहे. यावेळी भायखळा तुरुंगाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त कडक करण्यात आला असून, माध्यमांची गर्दी झालेली देखील पाहायला मिळाली. या आधी 3 वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आज (7 ऑक्टोबर) रियाचा जामीन अर्ज (Bail Application)मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे (Bombay HC allows the bail application of Rhea Chakraborty).
Mumbai: Actor Rhea Chakraborty released from Byculla jail after a month.
She was granted bail by Bombay High Court in a drug-related case filed against her by Narcotics Control Bureau (NCB) pic.twitter.com/FlfP1re1cQ
— ANI (@ANI) October 7, 2020
रियाला 8 सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तिचा जामीन अर्ज ((Bail Application) फेटाळून लावण्यात आला होता. एनसीबीने तीन दिवस 15 तास चौकशी केल्यानंतर रियाला अटक केली होती.
Maharashtra: Bombay High Court grants bail to Rhea Chakraborty (in file pic), rejects bail plea of her brother Showik Chakraborty.
Narcotics Control Bureau had arrested them in connection with a drugs case related to #SushantSinghRajput death pic.twitter.com/FqhCS7UzGy
— ANI (@ANI) October 7, 2020
जामीन मिळण्यास दिरंगाई का?
अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला एनसीबीने कलम 27 (A) अंतर्गत अटक झाली होती. ड्रग्ज तस्करीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्याचा हा गुन्हा आहे. त्यानुसार 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणात कोर्ट सामान्यपणे जामीन देत नाही.
रियाच्या अटकेच्या चार दिवस आधी तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली होती. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली होती. ((Bombay HC allows the bail application of Rhea Chakraborty).
जामिनासाठी धावाधाव
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 6 ते 8 सप्टेंबर या काळात एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. 8 सप्टेंबरला तिला अटक झाली. 8 सप्टेंबर रोजी रियाला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याचवेळी तिने महानगर दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज (Bail Application)केला होता, मात्र तो अर्ज कोर्टाने फेटाळला होता.
रियाने 9 सप्टेंबर रोजी मुंबई सेशन कोर्टातील एनडीपीएस विशेष कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. 11 सप्टेंबर रोजी सेशन कोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता.
रिया आणि शौविक यांनी 22 सप्टेंबर रोजी रिया आणि शौविक या दोघांनी मुंबई हायकोर्टात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यावर 23 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. पण पावसामुळे कोर्टाला सुट्टी असल्याने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली गेली.
या दोघांच्या जामीन अर्जावर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायाधीश सारंग व्ही. कोतवाल यांनी त्यावरील निर्णय राखून ठेवला होता.
Rhea Chakraborty gets bail on personal bond of Rs 1 lakh.
Court says, “Rhea should mark her presence for 10 days in police station after release, deposit her passport, not travel abroad without court permission & inform investigating officer if she has to leave Greater Mumbai” https://t.co/TBCLt1Cblx
— ANI (@ANI) October 7, 2020
जामिनानंतर रियासमोर कोर्टाच्या तीन अटी
मुंबई हायकोर्टाने रियाला दिलासा असला तरी तिला काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींनुसार रियाला तिचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय तिला मुंबईबाहेर जायचे असल्यास परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. चौकशीदरम्यान पोलिस स्टेशनला हजेरी लावणे बंधनकारक असणार आहे.
((Bombay HC allows the bail application of Rhea Chakraborty)