Sridevi | श्रीदेवी लग्नाआधी होत्या प्रेग्नंट? बऱ्याच वर्षांनंतर बोनी कपूर यांचा मोठा खुलासा

फेब्रुवारी 2018 मध्ये जेव्हा श्रीदेवी यांचं निधन झालं, तेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला होता. श्रीदेवी यांच्या निधनाच्या पाच वर्षांनंतर आता बोनी कपूर यांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले.

Sridevi | श्रीदेवी लग्नाआधी होत्या प्रेग्नंट? बऱ्याच वर्षांनंतर बोनी कपूर यांचा मोठा खुलासा
Sridevi, Boney Kapoor, Janhvi KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 03, 2023 | 12:10 PM

मुंबई | 3 ऑक्टोबर 2023 : निर्माते बोनी कपूर यांनी अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी 1996 मध्ये शिर्डीमध्ये लग्न केलं होतं. मात्र या लग्नाची घोषणा त्यांनी काही महिन्यांनंतर जानेवारीमध्ये केली होती. त्यावेळी श्रीदेवी गरोदर होत्या. त्यामुळे अनेकदा अशाही चर्चांना उधाण आलं होतं की, श्रीदेवी या लग्नाआधीच प्रेग्नंट होत्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर यांनी त्या चर्चांवर मौन सोडलं आहे. एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. लग्नाआधीच श्रीदेवी गरोदर होत्या, या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

श्रीदेवी यांच्या धार्मिक भावना

या मुलाखतीत बोनी कपूर यांनी कुटुंबीयांच्या धार्मिक भावनांबद्दलही सांगितलं. “श्रीदेवी असो, सुनिता (भाऊ अनिल कपूर यांची पत्नी) असो, मी किंवा माझी मुलगी जान्हवी असो, अनिल असो… आम्ही सर्वजण धार्मिक आहोत. माझी मुलगी दर तीन महिन्याला तिरुपतीला जाते. माझी पत्नी श्रीदेवी दरवर्षी तिच्या वाढदिवशी तिरुपतीला पूर्ण डोंगर चढून जायची. जेव्हा कधी माझ्यावर एखादं संकट यायचं, तेव्हा ती जुहूपासून सिद्धीविनायक मंदिरात अनवाणी चालत जायची”, असं ते म्हणाले.

श्रीदेवी लग्नाआधीच प्रेग्नंट?

श्रीदेवी यांच्यासोबतच्या लग्नाविषयी बोनी कपूर पुढे म्हणाले, “श्रीदेवीसोबत माझं दुसरं लग्न शिर्डीत पार पडलं होतं. 2 जून रोजी आम्ही लग्न केलं होतं. लग्नानंतर आम्ही शिर्डीतच एक रात्र घालवली. त्यानंतर जानेवारी महिन्यात श्रीदेवी गरोदर राहिल्याने आम्हाला लग्न जाहीर करावं लागलं होतं. खरंतर आम्ही 2 जून रोजी शिर्डीत लग्न केलं होतं. पण ते लग्न जानेवारी 1997 मध्ये जाहीर केल्याने लोकांना असं वाटलं की श्रीदेवी लग्नाआधीच गरोदर होती. म्हणून जान्हवीचा जन्म लग्नाआधी झाला, असं अजूनही काहीजण म्हणतात. पण त्यात काहीच तथ्य नाही.”

हे सुद्धा वाचा

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांनी 1996 मध्ये ल्गन केलं. या दोघांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. बोनी कपूर यांचं हे दुसरं लग्न होतं. त्याआधी त्यांनी सुनिताशी पहिलं लग्न केलं होतं. सुनिता आणि बोनी कपूर यांना अर्जुन कपूर आणि अंशुला कपूर ही दोन मुलं आहेत. फेब्रुवारी 2018 मध्ये श्रीदेवी यांचं दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून निधन झालं.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.