Rocky Aur Rani Ki Prem Kahani सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; अवघ्या 2 दिवसात छप्परफाड कमाई!
रणवीर सिंग - आलिया भट्ट स्टारर 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला... दोन दिवसांत केली इतक्या कोटींची कमाई...
मुंबई | 29 जुलै 2023 : बॉक्स ऑफिसवर सध्या रणवीर सिंग – आलिया भट्ट स्टारर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. २८ जुलै रोजी प्रेदर्शित झालेल्या सिनेमाला प्रेक्षक आणि विश्लेषकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘गली बॉय’ सिनेमानंतर आलिया – रणवीर यांना एकत्र पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. सध्या सर्वत्र आलिया आणि रणवीर यांच्या ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. एकीकडे अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसची चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे सिनेमाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर येत आहेत..
पहिल्या दिवशी सिनेमाने समाधान कारक कमाई केली होती. पण दुसऱ्या दिवशी मात्र सिनेमाच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर वेग धरला. दिग्दर्शक करण जोहर याच्या सिनेमाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. ज्यामुळे निर्मात्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे शनिवार – रविवार असल्यामुळे निर्मात्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमाने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तब्बल १६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत सिनेमाने ३.५ कोटी रुपये जास्त कमावले आहेत. आज रविवार असल्यामुळे सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पहिल्या दिवशी रणवीर सिंग – आलिया भट्ट स्टारर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाने ११.१० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. सिनेमाच्या दोन दिवसांच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर सिनेमाने २७.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता येत्या दिवसात सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रिपोर्टनुसार, करण जोहर याने सिनेमात छोट्या – छोट्या गोष्टींकडे देखील लक्ष दिलं आहे. १६० रुपयांच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेला सिनेमा येत्या दिवसात किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण १६० रुपये कोटी रुपयांचा आकडा गाठण्यासाठी सिनेमाने वेगात कमाई करणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाची कथा एका प्रेमकथे भोवती फिरताना दिसत आहे. सिनेमात अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमात आलिया भट्ट, रणवीर सिंग यांच्यासोबतच जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र आणि शबाना आझमी देखील महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.
सध्या सर्वत्र ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक करण जोहर याने केलं आहे. सिनेमाच्या माध्यमातून करण तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुन्हा पदार्पण केलं आहे.