Box Office वर दुसऱ्या दिवशी सनी देवोल यांचा ‘गदर’, अक्षयच्या OMG 2 कडे प्रेक्षकांची पाठ

सनी देओल स्टारर 'गदर २' सिनेमा ओलांडणार १०० कोटींचा गल्ला; अक्षय कुमार याच्या 'ओएमजी २' सिनेमाने कमावले फक्त इतके रुपये... बॉक्स ऑफिसवर 'गदर २' सिनेमाचा बोलबाला

Box Office वर दुसऱ्या दिवशी सनी देवोल यांचा 'गदर', अक्षयच्या OMG 2 कडे प्रेक्षकांची पाठ
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 8:52 AM

मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ आणि अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमा ११ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी प्रदर्शित झाला. दोन्ही सिनेमे दमदार असल्यामुळे कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं. पण बॉक्स ऑफिसवर मात्र ‘गदर २’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांनंतर सनी देओल प्रेक्षकांच्या भेटीस आल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार याच्या अनेक सिनेमांना अपयशाचा सामना कराला लागत आहे. अभिनेत्याला OMG 2 सिनेमाकडून अनेक अपेक्षा होत्या, पण अभिनेत्याला सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर निराशाच मिळत आहे.

आता ‘गदर २’ आणि OMG 2 सिनेमाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. पहिल्या दिवशी ‘गदर २’ सिनेमाने तब्बल ४० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला होता. दुसऱ्या दिवशी देखील सनी देओल यांच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारली आहे. सध्या सर्वत्र गदर २ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाने दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तब्बल ४३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाची दोन दिवसांची कमाई पाहता रविवारी ‘गदर २’ सिनेमी १०० कोटी रुपयांचा गल्ला पार करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तर अक्षय कुमार स्टारर OMG 2 सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, OMG 2 सिनेमाने शनिवारी १४.५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर पहिल्या दिवशी सिनेमाने १०.२६ कोटी रुपयांचा गल्ला पार केला होता. OMG 2 सिनेमाने दोन दिवसात फक्त २७.७६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. दुसरीकडे ‘गदर २’ सिनेमाने तब्बल ८३ कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे.

सांगायचं झालं तर, ‘गदर २’ सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. सिनेमा लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल. आज रविवार असल्यामुळे दोन्ही स्टारचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दिल्ली एनसीआर, मुंबई, लखनऊ, भोपाळ यांसारख्या इतर शहरांमध्ये देखील ‘गदर २’ सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. तर माउथ पब्लिसीटीचा फायदा ‘ओएमजी २’ सिनेमाला होणार की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.