Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadar 2 सिनेमाच्या कमाईला ब्रेक, अभिषेक बच्चन स्टारर ‘घूमर’ सिनेमाची स्थिती थक्क करणारी

Gadar 2 | प्रदर्शनानंतर सनी देओल स्टारर 'गदर २' सिनेमाकडे प्रेक्षकांची पाठ; अभिषेक बच्चन स्टारर 'घूमर' सिनेमाची कमाई तर थक्क करणारी... सध्या सर्वत्र प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या कमाईचीच चर्चा

Gadar 2  सिनेमाच्या कमाईला ब्रेक, अभिषेक बच्चन स्टारर 'घूमर' सिनेमाची स्थिती थक्क करणारी
Follow us
| Updated on: Aug 22, 2023 | 7:45 AM

मुंबई | 22 ऑगस्ट 2023 : ‘पठाण’, ‘द केरला स्टोरी’ या दोन सिनेमांतर अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करताना दिसत आहे. सिनेमाने अनेक मोठ्या सिनेमांवर मात केली आहे. सनी देओल यांना पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत असल्याचं चित्र दिसून आलं. पण आता सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करणाऱ्या ‘गदर २’ सिनेमाच्या कमाईला ब्रेक लागला आहे. पण महत्त्वाची गोष्टी म्हणजे, सनी देओल याच्या सिनेमापुढे कोणताही सिनेमा जावू शकला नाही. १८ ऑगस्ट रोजी अभिनेता अभिषेक बच्चन स्टारर ‘घूमर’ सिनेमा प्रदर्शित झाला. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर योग्य कमागिरी करू शकला नाही.

सिनेमा प्रदर्शित होऊन चार दिवस झाले आहेत. सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाची अवस्था बिकट आहे. अभिषेक आणि सैयामी यांचा सिनेमा अभिनय उत्कृष्ट आहे पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. ‘घूमर’ सिनेमाची कमाई समोर आली आहे.

अभिषेक बच्चनच्या स्पोर्ट्स ड्रामा सिनेमाने पहिल्या दिवशीही फारसे कलेक्शन केलं नाही. वीकेंडला सिनेमाच्या कमाईत थोडीफार वाढ झाली, मात्र घूमर शर्यतीतून बाहेर गेल्याचं सोमवारी स्पष्ट झालं. घूमरने पहिल्या दिवशी ८५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.१ कोटी, तिसऱ्या दिवशी १.५० कोटी आणि चौथ्या दिवशी ०. ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर एकूण संकलन ३.९५ कोटी होईल. अशा प्रकारे सिनेमाने तीन दिवसांत फक्त ३.९५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दरम्यान, ११ ऑगस्ट रोजी ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. पण ‘गदर २’ सिनेमाच्या लोकप्रियते पुढे अभिनेता अक्षय कुमार याचा ‘ओएमजी २’ सिनेमा देखील दमदार कामगिरी करू शकला नाही. ‘ओएमजी २’ सिनेमा १०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये सामिल झाला. पण ‘घूमर’ सिनेमाला अपयश स्वीकारावं लागलं आहे.

‘गदर २’ सिनेमाने ११ दिवशी फक्त १४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशात अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाने आतापर्यंत ३८९.१० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ सिनेमाने आतापर्यंत ११७.२७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाच्या कमाईला दुसऱ्या आठवड्यात मात्र ब्रेक लागला आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या ‘पठाण’ सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. सिनेमाने फक्त देशातच नाही तर, परदेशात देखील रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता ‘गदर २’ सिनेमा ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करु शकतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे .

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाने ५४३.०५ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘गदर २’ ने ‘द केरला स्टोरी’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ‘द केरला स्टोरी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २४२.२० कोटी रुपये कमावले होते. आता ‘गदर २’ सिनेमा किती कोटी रुपयांची कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.