व्हॅलेंटाईन डे ‘पठाण’साठी ठरला लकी ; एका दिवसात सिनेमाने केली इतक्या कोटी रुपयांची कमाई

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 'पठाण'ने रचला विक्रम, २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा आजही बॉक्स ऑफिसवर बोलबाला.... व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी सिनेमाने केला इतक्या कोटी रुपयांचा व्यवसाय...

व्हॅलेंटाईन डे 'पठाण'साठी ठरला लकी ; एका दिवसात सिनेमाने केली इतक्या कोटी रुपयांची कमाई
Shah Rukh KhanImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 10:28 AM

Pathaan Box Office : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अभिनेता शाहरुख खान (shah rukh khan) स्टारर ‘पठाण’ (pathaan) सिनेमाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’चा बोलबाला आजही बॉक्स ऑफिसवर असल्याचं चित्र दिसून येत आहे. प्रदर्शनानंतर सिनेमा चाहत्यांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरला आहे. फक्त भारतातच नाही तर, परदेशात देखील पठाण सिनेमाने अनेक विक्रम रचले आहेत. भारतात सिनेमा जवळपास ५०० कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मंगळवारी व्हॅलेंटाईन डे होता. व्हॅलेंटाईन डेचा ‘पठाण’ सिनेमाला मोठा फायदा झाला आहे.

पठाण सिनेमा सलग २१ दिवस मोठ्या पड्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. २१ व्य दिवशी सिनेमा ५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला. शाहरुख खान याचा ‘पठाण’ सिनेमा फक्त भारतातच नाही परदेशात देखील मोठी कमाई करातना दिसत आहे. सिनेमाने आतापर्यंत ९५० कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. (box office collection of pathaan)

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Yash Raj Films (@yrf)

सिनेमा येत्या काही दिवसांत १०० कोटी रुपयांचा गल्ला जमा करेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पठाणच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. 5.50-5.75 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. याआधी ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी देखील सिनेमाच्या कमाईबद्दल मोठी माहिती दिली. (pathaan on Valentines Day 2023)

तरण आदर्श यांनी सांगितलेल्या आकड्यांनुसार, सिनेमाने २० दिवसांत 475.95 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. शिवाय तमिळ आणि तेलुगूमध्ये पठाण सिनेमाने 17.30 कोटींची कमाई केली आहे. तर सिनेमाने २१ दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर ४९८.७५ ते ४९९ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

शाहरुख खान याचा पठाण सिनेमा प्रदर्शनापूर्वी वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने ‘बेशर्म रंग’ गाण्यात घातलेल्या भगव्या बिकिनीमुळे वाद टोकाला पोहोचला होता. अनेकांनी सिनेमावर बहिष्कार टाकण्याची देखील मागणी घेतली. पण कोणत्याही सिनेमाचा पठाण सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कोणताही परिणाम झालेला नाही. सिनेमाने प्रदर्शनानंतर तीन दिवसांत अनेक रेकॉर्ड मोडले. (pathaan box office collection)

सांगायचं झालं तर, शाहरुख खान याने मोठ्या पदड्यावर तब्बल चार वर्षांनंतर पदार्पण केल्यामुळे अभिनेत्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांनी सिनेमागृहात एकच गर्दी केली. सिनेमाने देखील चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन केलं आणि आजही करत आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाचं प्रमोशन न करुनही बॉक्स ऑफिसवर पठाण मोठी कमाई करताना दिसत आहे. सिनेमाचं प्रमोशन केलं नसलं तरी, शाहरुख खान आस्क एसआरके (#AskSRK) सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो.

गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.
शिंदे म्हणाले; 'मी काळजीवाहू CM, सगळ्यांची काळजी घेतोय, आजही खूश...'
शिंदे म्हणाले; 'मी काळजीवाहू CM, सगळ्यांची काळजी घेतोय, आजही खूश...'.
फडणवीस तिसऱ्यांदा CM, दिल्लीत शिक्कामोर्तब तर शिंदेंच्या वाट्याला काय?
फडणवीस तिसऱ्यांदा CM, दिल्लीत शिक्कामोर्तब तर शिंदेंच्या वाट्याला काय?.
मुख्यमंत्री फडणवीस? दिल्लीत फैसला पण देसाई,चंद्रकांतदादांचा सूर वेगळा?
मुख्यमंत्री फडणवीस? दिल्लीत फैसला पण देसाई,चंद्रकांतदादांचा सूर वेगळा?.
खातेवाटपावरुन इनसाईड स्टोरी, कोणाचे किती मंत्री अन कोणाकडे कोणती खाती?
खातेवाटपावरुन इनसाईड स्टोरी, कोणाचे किती मंत्री अन कोणाकडे कोणती खाती?.