Gadar 2 सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे… PVR-Inox ने केली इतक्या कोटींची कमाई

Gadar 2 | अभिनेते सनी देओल स्टारर 'गदर २' सिनेमाचं चाहत्यांच्या मनावर राज्य... सर्वत्र फक्त आणि फक्त 'गदर २' सिनेमाचा बोलबाला... ‘गदर २’सिनेमाला प्रेक्षकांची अधिक पसंती

Gadar 2 सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे... PVR-Inox ने केली इतक्या कोटींची कमाई
Gadar 2 Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 7:46 AM

मुंबई | 15 ऑगस्ट 2023 : ११ ऑगस्ट रोजी अभिनेता अक्षय कुमार स्टारर ‘ओएमजी २’ आणि अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. दोन्ही सिनेमे प्रदर्शित होण्यापूर्वी बॉक्स ऑफिसचा ‘बाजीगर’ कोण ठरणार अशा अनेक चर्चा रंगत होत्या. पण तीन दिवसात ‘गदर २’ सिनेमाने मोठी कमाई केली आहे. दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्यानंतर कमाईचे आकडे देखील समोर आले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसचा ‘बाजीगर’ समोर आला आहे. प्रेक्षकांनी ‘ओएमजी २’ सिनेमाला नाही तर, ‘गदर २’ सिनेमाला अधिक पसंती दिली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाच्या कमाईची चर्चा रंगत आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमांच्या कमाईचा परिणाम शेयर बाजावर होताना दिसत आहे. PVR-Inox शेअर्समध्ये सोमवारी तेजी पाहायला मिळली. आकडेवारीनुसार, कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शुक्रवार बद्दल सांगायचं झालं तर, दोन दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने ९९० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

‘गरद २’ सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन शुक्रवार – ४०.१ कोटी रुपये शनिवार – ४३.०८ कोटी रुपये रविवार – ५१.०७ कोटी रुपये सोमवार – ३९ कोटी रुपये

चित्रपटगृहात तीन सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ‘जेलर’, ‘OMG 2’, ‘गदर 2’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. यंदाच्या आठवड्यात २.१० कोटी लोक सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले आहेत. प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) ने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय चित्रपटसृष्टीच्या १०० वर्षांहून अधिक काळातील ही सर्वाधिक संख्या आहे

दिल्ली एनसीआर, मुंबई, लखनऊ, भोपाळ यांसारख्या इतर शहरांमध्ये देखील ‘गदर २’ सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. तर माउथ पब्लिसीटीचा फायदा ‘ओएमजी २’ सिनेमाला होणार की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

PVR Inox ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट २०२३ रोजी एका दिवसातील बॉक्स ऑफिस कलेक्शनचा सर्वाधिक उच्चांक गाठला. तर ११ ते १३ ऑगस्ट दरम्यान, सर्वात जास्त फायदा मिळाला आहे. या दरम्यान तब्बल ३३.६ लाख लोक चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी आले आहेत. यामुळे तब्बल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई झाली आहे.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.