रितेश-जिनिलीया यांच्या प्रेमाचं चाहत्यांना ‘वेड’; सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला

वर्षाच्या सुरुवातील रितेश-जिनिलीया यांना मिळतंय चाहत्यांचं भरभरुन प्रेम; पहिल्या आठवड्यात सिनेमाने गोळ केला कोट्यवधींचा गल्ला

रितेश-जिनिलीया यांच्या प्रेमाचं चाहत्यांना 'वेड'; सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
रितेश-जिनिलीया यांच्या प्रेमाचं चाहत्यांना 'वेड'; सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 4:19 PM

मुंबई : शुक्रवारी सिनेमे रुपेरी पडद्यावर दाखल होतात. पण काही ठराविक सिनेमांना चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळतं. अभिनेता रितेश देखमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख यांच्या ‘वेड’ सिनेमाला देखील प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. ‘वेड’ सिनेमाने प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. ३० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या सिनेमाला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. सध्या सर्वत्र रितेश-जिनिलीया यांच्या मराठी सिनेमाचं कौतुक होत आहे.

पहिल्या तीन दिवसांत सिनेमाने तब्बल १० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. शुक्रवारी सिनेमाने २.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सिनेमाने ३.२५ कोटी रुपयांपर्यंत मजल मारली असून रविवारी सिनेमाने ४.५० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. अशा प्रकारे सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत जवळपास १० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

‘वेड’ सिनेमातून जिनिलीयाने मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं आहे, तर दुसरीकडे रितेशने दिग्दर्शन क्षेत्रात पाय ठेवलं आहे. दोघांच्या पहिल्या प्रयोगाला चाहत्यांनी भरभरून प्रेम देखील दिलं. सध्या सर्वत्र ‘वेड’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाच्या मोठ्या पडद्यापासून ते खऱ्या आयुष्यातील सोबतीपर्यंत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा यांची जोडी नेहमीच यशस्वी ठरली आहे.

रितेशने याआधी मराठी आणि हिंदी कलाविश्वात मोलाची कामगिरी केली आहे, तर जिनिलीयाने देखील बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण दाक्षिणात्य सिनेविश्वात जिनिलीयाचा बोलबाला आहे. हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये हिट चित्रपट देणारी जिनिलिया ‘वेड’ या चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलं आहे.

जिनिलिया-रितेशच्या करिअरला सुरुवात! जिनिलिया-रितेश यांनी २००३ मध्ये एकत्र करिअरला सुरुवात केली. दोघांची भेट ‘तुझे मेरी कसम’ सिनेमाच्या सेटवर झाली. ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून दोघांनीही आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यनंतर २०१२ पुन्हा दोघे ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटात ही जोडी पाहायला मिळाली. त्याच वर्षी जिनिलिया आणि रितेशचे लग्नही झालं.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.