बॉयकॉट बॉलिवूडचं ट्रेंड बदलण्याची गरज, सुनील शेट्टी असं का म्हणालेत
देशाच्या विकासात बॉलिवूडचा सहभाग मोठा राहिला आहे. संगीत, संस्कृतीनंही देशाच्या विकासात मोठा हातभार लावला.
मुंबई : उत्तर प्रदेशात सिनेसृष्टी जात असेल, तर ती चांगली बाब आहे. या निर्णयामुळं आनंदित आहे. खूप चांगला प्लान आहे. सर्वंकश विचार आहे. माझ्या करिअरमध्ये उत्तर प्रदेशची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. असं मत अभिनेते सुनील शेट्टी यांनी व्यक्त केलं. उत्तर प्रदेशात चित्रपटाचं कौतुक झाल्यास संपूर्ण देश संबंधित चित्रपट पाहू इच्छितो. असा माझा अनुभव असल्याचंही सुनील शेट्टी यांनी सांगितलं.
बॉयकॉट बॉलिवूडचं ट्रेंड बदलण्याची गरज आहे, असं मला वाटतं. हा ट्रेंड बदलल्यास खूप फरक पडेल. व्यवसाय म्हटलं तर त्यात चढाव उतार सुरुच राहतात. बॉयकॉट बॉलिवूडचा ट्रेंड हटल्यास खूप चांगलं होईल, असं सुनील शेट्टी यांनी म्हंटलं.
देशाच्या विकासात बॉलिवूडचा सहभाग मोठा राहिला आहे. संगीत, संस्कृतीनंही देशाच्या विकासात मोठा हातभार लावला. एखादा व्यक्ती चुकीचा असेल, तर पूर्ण कुटुंबाचा चुकीचं म्हणता येणार नाही. मी गेल्या ३५ वर्षांपासून चित्रपट इंडस्ट्रीत आहे.
देशाचा विकास होत असेल तर कोणत्याही राज्याला नाराज होण्याचं कारण नाही. मग तो महाराष्ट्र, कर्नाटक किंवा उत्तरप्रदेश का असो. देशात ज्या लोकेशन आहेत, त्या लोकेशन जगातील कोणत्याही देशात नसल्याचंही सुनील शेट्टी यांनी सांगितलं.
कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळे स्पॉट्स आहेत. देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा चित्रपटाच्या शुटिंगसाठी घेतल्या पाहिजे. ओटीटीला त्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे, असंही सुनील शेट्टी यांनी म्हंटलं.