Brahmastra 2: रणवीर सिंग नाही तर KGF सुपरस्टार यश साकारणार देव?

'ब्रह्मास्त्र 2'मध्ये 'रॉकी भाई' साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका?

Brahmastra 2: रणवीर सिंग नाही तर KGF सुपरस्टार यश साकारणार देव?
रणवीर नाही तर KGF सुपरस्टार यश साकारणार देव? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 1:26 PM

मुंबई- अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर दमदार प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने प्रेक्षकांच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित केले. यातील देवच्या भूमिकेवरून अद्याप पडदा उचलला गेला नाही. त्यामुळे देवच्या भूमिकेत नेमका कोणता कलाकार असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट एकूण तीन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या भागात देवच्या भूमिकेला अधिक महत्त्व असेल असा अंदाज असेल. अशातच या भूमिकेसाठी प्रसिद्ध दाक्षिणात्य सुपरस्टारला ऑफर दिल्याचं कळतंय.

कटप्पाने बाहुबलीला का मारलं, असा प्रश्न काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या मनात घोळत होता. बाहुबली- द बिगनिंग या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर दोन वर्षांपर्यंत या प्रश्नाने प्रेक्षकांना छळलं. प्रत्येकाने आपापल्या विचारसरणीनुसार त्याचं कारण समोर आणलं. मात्र त्याचं खरं उत्तर 2017 मध्ये मिळालं. आता ब्रह्मास्त्रच्या प्रदर्शनानंतर असाच एक प्रश्न प्रेक्षकांना सतावतोय. हा देव नक्की कोण आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.

हे सुद्धा वाचा

देवच्या भूमिकेसाठी सोशल मीडियावर अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा झाली. चित्रपटात दीपिका पदुकोण असल्याने देवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार, असाही अंदाज वर्तवला गेला. इतकंच नव्हे तर अभिनेता ऋतिक रोशन या भूमिकेसाठी योग्य असल्याचं म्हटलं गेलं. मात्र निर्मात्यांनी त्यावर अद्याप काही ठोस उत्तर दिलं नाही.

View this post on Instagram

A post shared by Yash (@thenameisyash)

आता पिंकविला या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ब्रह्मास्त्रच्या निर्मात्यांनी आता केजीएफ स्टार यशशी संपर्क साधला आहे. ब्रह्मास्त्र 2 मधील देवच्या भूमिकेसाठी यशला विचारण्यात आल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अद्याप निर्मात्यांनी अधिकृत माहिती दिली नाही. यशला उत्तर देण्यासाठी त्यांनी जानेवारी 2023 पर्यंतचा वेळ दिला आहे.

यशच्या ‘केजीएफ 2’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनलाही तुफान प्रतिसाद मिळाला होता. जर यशने देवच्या भूमिकेसाठी होकार दिला तर चाहत्यांसाठी ही मोठी पर्वणीच असेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.