Gadar 2 निर्मात्यांचा मोठा निर्णय; ‘या’ प्रोमोकोडचा वापर करत सिनेमाच्या तिकिटांवर मिळावा Buy 2 Get 2 ऑफर

Gadar 2 | रक्षाबंधनच्या मुहूर्तावर 'गदर 2' सिनेमाच्या निर्मात्यांकडून मोठी घोषणा... 2 तिकिटांवर मिळवा 2 तिकिटं मोफत... 'या' प्रोमोकोडचा वापर करत घ्या आनंद ... सध्या सर्वत्र तारा सिंगची चर्चा...

Gadar 2 निर्मात्यांचा मोठा निर्णय; 'या' प्रोमोकोडचा वापर करत सिनेमाच्या तिकिटांवर मिळावा Buy 2 Get 2 ऑफर
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 8:43 AM

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : अभिनेते सनी देओल स्टारर ‘गदर 2’ सिनेमाचा बोलबाला सर्वत्र पाहायला मिळत आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ सिनेमाने फक्त भारतात नाही तर, जगभरातील अनेक विक्रम मोडले आहेत. सिनेमाला प्रदर्शित होवून १९ दिवस झाले आहेत. १९ दिवस उलटून देखील ‘गदर 2’ सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात मोठी गर्दी करत आहेत. रक्षाबंधन असल्यामुळे आणि अनेकांना सुट्टी असल्यामुळे प्रेक्षक ‘गदर 2’ सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातील याची शक्यता नाकारता येत नाही. रक्षाबंधनच्या मुहूर्तावर ‘गदर 2’ सिनेमा पाहणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सध्या सर्वत्र ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

सनी देओल स्टारर ‘गदर २’ सिनेमाला मिळत असलेलं प्रेम लक्षात घेत, सिनेमाच्या निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांनी Buy 2 Get 2 ऑफर प्रेक्षकांना दिली आहे. ज्यामुळे सनी देओल यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ऑफरमुळे सिनेमाच्या कमाईत वाढ होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

‘गदर २’ सिनेमाची दोन तिकिटं खरेदी केल्यानंतर प्रेक्षकांना दोन तिकिटं मोफत मिळणार आहेत. निर्मात्यांनी जाहीर केलेली ऑफर २९ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर पर्यंत आहे. ऑफरसंबंधी एक पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. एका प्रोमोकोडचा वापर करत प्रेक्षकांनी ऑफरचा लाभ घेता येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘गदर 2’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. पोस्टच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोमोकोड देण्यात आला आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘गदर 2’ सिनेमाचा बोलबाला

सिनेमाने आतापर्यंत ४६५.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. आता ऑफरमुळे सिनेमला किती कोटी रुपयांचा फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘गदर 2’ सिनेमा यंदाच्या वर्षांतील सुपरहीट सिनेमांपैकी एक ठरला आहे. ‘पठाण’ आणि ‘द केरळ स्टोरी’ सिनेमानंतर ‘गदर 2’ सिनेमाचं राज्य बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. पण सिनेमा अभिनेता शाहरुख खान स्टारर ‘पठाण’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकेल का? हे पाहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

‘गदर 2’ सिनेमा २००१ साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर’ सिनेमाचा सिक्वल आहे. ‘गदर’ सिनेमाला देखील चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर सिनेमा सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सिनेमातील डायलॉग आणि गाणी देखील चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.