अमिताभ बच्चन यांचे अकाऊंट सांभाळणारा CA आज 28,000 कोटी कंपनीचा मालक; शेतकऱ्याच्या लेकानं नाव काढलं
एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा जो कधी मिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाचे सीए म्हणून काम पाहत होता. आज त्यानेच 28000 कोटींची कंपनी उभारली आहे. एवढच नाही तर भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये स्थान निर्माण केले आहे.
आपल्या जिद्द आणि कौशल्याच्या बळावर माणूस किती मोठी झेप घेऊ शकतो याचे बरेच उदाहरण आपण पाहतो. असे अनेक उद्योजक आहेत ज्यांनी अगदी शून्यातून त्यांचे विश्व निर्माण केलं आहे. कारण जिद्द असल्यास यश नक्कीच मिळते हे त्यांनी दाखवून दिलं आहे.
अमिताभ बच्चन अन् त्यांच्या कुटुंबासाठी सीए म्हणून काम केलं
आपल्या मेहनतीच्या बळावर असचं शून्यातून विश्व निर्माण करणारा एक शेतकरी पुत्र म्हणजे प्रेमचंद गोधा. जे कधी अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाचे सीए म्हणून काम पाहत होते. प्रेमचंद गोधा हे राजस्थानच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले.
प्रेमचंद गोधा यांचे संगोपन आणि प्रारंभिक शिक्षण सामान्य ग्रामीण वातावरणात झाले. पुढे त्यांनी चार्टर्ड अकाउंटन्सीचे शिक्षण घेतले आणि या व्यवसायाने त्यांचे आयुष्यच बदलून टाकले.
सीए म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारे प्रेमचंद गोधा यांनी अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाचे सीए म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर त्यांनी बच्चन कुटुंबाचा विश्वास जिंकला. आर्थिक व्यवस्थापनासोबतच गोधा यांनी व्यावसायिक म्हणूनही आपले कौशल्य विकसित केले. ज्याचा त्यांना पुढेजाऊन खूप मोठा फायदा झाला.
बच्चन कुटुंबासोबत गुंतवणूक केली अन्…
प्रेमचंद गोधा यांनी 1975 मध्ये बच्चन कुटुंबासह IPCA लेबॉटरीज कंपनीत गुंतवणूक केली. त्यावेळी ही कंपनी गंभीर आर्थिक संकटातून जात होती. गोधा यांनी हे आव्हान स्वीकारलं आणि अशी रणनीती बनवली की कंपनी पुन्हा एकदा स्वबळावर उभी राहीली. प्रेमचंद गोधा यांच्या नेतृत्वाखाली इप्का लॅबोरेटरीजने आपला ठसा उमटवला.
त्यानंतर कंपनीने मधुमेह, हृदयरोग, मलेरिया यासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी उच्च दर्जाची औषधे तयार करण्यास सुरुवात केली. लवकरच कंपनीने व्यवसायाच्या जगात मोठी झेप घेतली. कंपनीचा महसूल 54 लाख रुपयांवरून 4422 कोटी रुपयांपर्यंत वाढला.
प्रेमचंद गोधा यांची एकूण नेटवर्थ
बच्चन कुटुंबाने 1999 मध्ये इप्का लॅबोरेटरीजमधील त्यांचे स्टेक विकले. असे असूनही प्रेमचंद मात्र कंपनीसोबतच राहिले. त्यांनी कंपनीला खूप उंचीवर नेले. गोधा यांचे वय आता 71 असून आज इप्का लॅबोरेटरीज ही 28,000 कोटी रुपयांची कंपनी आहे. अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती 10,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांनी आपल्या व्यवसायातून अमाप संपत्ती कमावली आणि भारतातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये स्थान निर्माण केले.
प्रेरणादायी कथा
प्रेमचंद गोधा यांनी आपल्या या मेहनतीने हे सिद्ध करून दाखवलं की ठरवलं तर सगळं काही शक्य असतं. आणि परिस्थितीही तुमची तेव्हा हळू हळू साथ द्यायला लागते. त्यामुळे गोधा यांचा हा प्रवास प्रत्येक व्यक्तीसाठी तसेच नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.