डान्स शिकण्यासाठी आला आणि लग्नाचा सिक्सर मारला, धनश्रीने सांगितला युजवेंद्र चहलचा तो किस्सा
त्या दिवसांत मी डान्स शिकवायचे. सोशल मीडियावर माझ्या डान्सचे व्हिडिओ त्याने पाहिले. विद्यार्थी होण्यासाठी त्याने माझ्याशी संपर्क साधला. पण दोन महिन्याने त्याने प्रेमाचा सिक्सर मारला.

मुंबई | 07 जानेवारी 2024 : ‘झलक दिखला जा 11’ मध्ये 6 वाईल्ड कार्ड स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. त्यापैकी फक्त 4 जण शोमध्ये पुढे जातील. डान्सर धनश्री वर्मा हिनेही यात सहभाग घेतला आहे. ‘क्रेझी किया रे’ वर नेत्रदीपक नृत्य करून तिने या डान्स शो मध्ये शानदार एन्ट्री केली. याच शो दरम्यान धनश्री वर्मा हिने पती आणि क्रिकेटर पती युजवेंद्र चहल यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली याचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा खूप मनोरंजक आहे. आपल्या प्रेम कहाणीवर बोलताना तिने ‘तो फलंदाजी करत नाही, पण त्याने सरळ षटकार मारला अशी प्रेमाल कबुलीही दिलीय.
रोमांचक भागांसह ‘झलक दिखला जा 11’ दररोज प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शेवटच्या एपिसोडमध्ये 6 वाइल्ड कार्ड्सनी शोमध्ये स्थान मिळवण्यासाठी धमाकेदार कामगिरी केली. निर्मात्यांनी वाइल्ड कार्डसाठी एक मनोरंजक आव्हान सादर केले. कारण एकूण 6 स्पर्धकांपैकी फक्त चार जणांना शोमध्ये पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. कोरिओग्राफर आणि दंतचिकित्सक धनश्री वर्मा ही देखील या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड्धारक आहे.
‘झलक दिखला जा 11’ शो चे जजेस फराह खान, अर्शद वारसी, मलायका अरोरा यांनी धनश्री वर्मा हिच्या नृत्याचे खूप कौतुक केले. तिच्या ‘क्रेझी किया रे’ या डान्सनंतर गौहर आणि ऋत्विक यांनी तिला भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल सोबतच्या प्रेमकथेबद्दल विचारले. त्यावेळी तिने हा किस्सा शेअर केला.
कशी सुरू झाली धनश्री आणि युझवेंद्र चहलची प्रेमकहाणी?
लॉकडाऊन दरम्यान युझवेंद्रने डान्स शिकण्यासाठी पहिल्यांदा तिच्याशी संपर्क साधला. लॉकडाऊन दरम्यान कोणतेही सामने होत नव्हते. सर्व क्रिकेटपटू घरी बसले होते. त्या दरम्यान युझवेंद्रने ठरवलं की आपल्याला डान्स शिकायचा आहे. त्याने सोशल मीडियावर माझ्या डान्सचे व्हिडिओ पाहिले होते. त्याने विद्यार्थी होण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला. मी त्याला शिकवायला तयार झाले.
आमच्या दोघांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक असे खूप छान बाँन्डीग तयार झाले होते. त्याने माझ्याकडून दोन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. त्याला एक चांगला डान्सर बनवले. पण, दोन महिन्यांनी अचानक त्याने थेट माझ्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तो फलंदाजी करत नाही पण त्याने थेट षटकार मारला होता. युझवेंद्रने प्रपोज केल्यामुळे मला धक्काच बसला. मी थेट माझ्या आईला सांगितले. ती पहिली म्हणाली, ‘गया तेरा विद्यार्थी’, असे धनुश्री हिने सांगितले.
धनुश्री आणि युझवेंद्र यांची ही गोड प्रेमकहाणी ऐकून सर्व जजेस अवाक झाले. यावर अर्शद आणि फराह यांनी तिची मस्करी केली. युझवेंद्रने तुला मूर्ख बनवले. त्याने तुला सोशल मीडियावर पाहिले असेल. त्याला तू आवडली म्हणून तुझ्याजवळ येण्यासाठी डान्स हे एक निमित्त होते अशी कोपरखळी फराह हिने लगावली.