मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही करीना हिची लोकप्रियता कमी झालेली नाही. बॉलिवूडच्या अनेक जुन्या परंपरा करीना कपूर हिने मोडून काढल्या आहेत. आजही करीना सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असते. सध्या सर्वत्र करीना हिच्या ‘जानेजान’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमा २१ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात करीना हिच्यासोबत अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेता जयदीप अहलावत यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. आता जयदीप याने अभिनेत्रीबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे. ज्यामुळे करीना पुन्हा चर्चेत आली आहे.
जयदीप याने सेटवर घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. जयदीप म्हणाला, ‘ सिनेमाच्या सेटवर प्रत्येक जण करीना हिच्या सौंदर्यावर घायाळ होता.. एक सीन होता ज्यामध्ये मला दरवाजा उघडायचा होता आणि दुसऱ्या बाजूला करीना उभी होती. कॅमेरा टीम मला तिच्या जवळ नेण्याच्या प्रयत्नात होते…’
पुढे अभिनेता म्हणाला, ‘एका कॅमेरा ऑपरेटर त्याठिकाणी उभा होता आणि त्याच्या खांद्यावर कॅमेरा होता… तेव्हा सुजॉय यांनी ऍक्शन म्हणताच दरवाजा उघडला आणि कॅमेरा ऑपरेटर जमीनीवर पडला… मी तेव्हा दिवसभर कॅमेरा ऑपरेटरची खिल्ली उडवली ‘तुला काय वाटतं तिच्या डोळ्यांमध्ये पाहणं इतकं सोपं आहे का?’ असं म्हणत मी कॅमेरा ऑपरेटरला चिडवत होतो..’
सिनेमाचे दिग्दर्शक सुजॉय घोष म्हणाले, ‘तेव्हा कॅमेरा ऑपरेटरचे प्राण धोक्यात होते. त्याला काही झालं असतं तर, दुसऱ्या कॅमेरा ऑपरेटरला शोधावं लागलं असतं आणि त्यासाठी माझ्याकडे बजेट नव्हता..’ नुकताच झालेल्या मुलाखतीत जयदीप अहलावत आणि सुजॉय घोष यांनी विनोदी अंदाजात अनेक गोष्टी सांगितल्या. सध्या सर्वत्र करीना कपूर आणि अभिनेत्रीचा सिनेमा ‘जानेजान’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘जानेजान’ सिनेमानंतर करीना कपूर ‘द बकिंघम मर्डर्स’ सिनेमात दिसणार आहे. त्यानंतर अभिनेत्री ‘द क्रू’ सिनेमात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात करीना हिच्यासोबत तब्ब आणि क्रिती सनॉन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय ‘लूटकेस’ सिनेमातून देखील करीना चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.