फक्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिली ‘ही’ अभिनेत्री, 6 सेलिब्रिटींसोबत अफेअर, एकासोबत 9 वर्ष लिव्हइनमध्ये, पण…
फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्रीला ओळखलं? एक दोन नाही तर, 6 सेलिब्रिटींसोबत होतं अभिनेत्रीचं अफेअर, 9 वर्ष होती लिव्हइन रिलेशनशिपमध्ये, एकाने लग्नाला दिला नकार, त्यानंतर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा
मुंबई | 7 जानेवारी 2024 : बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांची लोकप्रियता फार काळ टिकून राहिली नाही. पण अभिनेत्रीत्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. फोटोत दिसरणारी चिमुकली बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी, खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री बिपाशा बासू आहे. आज बिपाशा अभिनेता आणि पती करण सिंह ग्रोवर याच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री तिच्या अफेअर्समुळे चर्चेत होता. बिपाशा हिने एक, दोन नाही तर, तब्बल 6 सेलिब्रिटींनी डेट केलं आहे. सध्या सर्वत्र बिपाशा हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
बिपाशा बासूच्या वादग्रस्त लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर, मॉडेलिंगदरम्यान बिपाशा बासू हिची भेट प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण याच्यासोबत झाली. त्यांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात देखील झालं… असं म्हटलं जातं. एवढंच नाही तर, दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं, पण त्यांचे नातं फार काळ टिकले नाही.
मॉडेलिंगनंतर बिपाशा हिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राज’ सिनेमात बिपाशा हिने डिनो मोरिया याच्यासोबत स्क्रिन शेअर केली. दरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी देखील जोर धरला. पण सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला… अशी चर्चा देखील अनेकदा रंगली.
बिपाशा 9 वर्ष होती लिव्हइन रिलेशनशिपमध्ये
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम याच्यासोबत देखील बिपाशा 9 वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. दरम्यान, दोघे लिव्हइन रिलेशनशिपमध्ये देखील राहात होते. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. जेव्हा बिपाशा हिने जॉन याच्याकडे लग्न करण्याची मागणी केली तेव्हा, जॉन लग्नासाठी तयार नव्हता आणि याच कारणामुळे बिपाशा आणि जॉन यांचं ब्रेकअप झालं.
जॉन याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता सैफ अली कान आणि अभिनेता हरमन बावेजा यांची देखील एन्ट्री झाली. पण दोघांसोबत देखील अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर बिपाशा हिने 2016 मध्ये टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवर याच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर बिपाशा हिने 2 नोव्हेंबर 2022 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या लेकीचं नाव देवी असं आहे.