श्रीमंत कुटुंबात झाला जन्म, आईला कंटाळून दोनदा स्वतःला संपवण्याचा केला प्रयत्न, आज बॉलिवूडवर करते राज्य
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं? आईला कंटाळून दोनदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणारी 'ही' चिमुकली आज बॉलिवूडवर करतेय राज्य...
मुंबई | 29 जुलै 2023 : सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या लहानपणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहानपणाचं आकर्षण प्रत्येकाला असतं, पण आपला आवडता सेलिब्रिटी लहानपणी कसा दिसत होता… याची उत्सुकता देखील चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. सध्या ज्या चिमुकलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो फोटो बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा आहे… फोटोत दिसणारी अभिनेत्री आज बॉलिवूडवर राज्य करत असून प्रसिद्ध सेलिब्रिटीची पत्नी देखील आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या चिमुकलीचा जन्म एका प्रसिद्ध आणि श्रीमंत कुटुंबात झाला. पण बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क करणं अभिनेत्रीसाठी फार कठीण होतं.
पण सर्व संकटांवर मात करत अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. संधी मिळाल्यावर अभिनेत्रीने स्वत:ला सिद्ध करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. अभिनेत्रीला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. एवढेच नाही तर तिला भारत सरकारकडून पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्करा देवून सन्मानित कण्यात आलं.
सध्या सोशल मीडियावर ज्या अभिनेत्रीच्या लहानापणीचा फोटो व्हायरल होत आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री शबाना आझमी आहेत. शबाना आझमी कैफी आझमी आणि शौकत आझमी यांच्या कन्या आहेत. अभिनेत्रीच्या आईने त्यांच्या ऑटोबायोग्राफी कैफ एंड आय मेमॉयरमध्ये शबाना यांच्याबद्दल देखील मोठा खुलासा केला.
शबाना आझमी यांनी दोनदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता.. असं देखील पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. . पुस्तकानुसार, शबाना आझमी यांना वाटलं की, आई त्यांच्यावर कमी आणि भावावर जास्त प्रेम करते. त्यामुळे त्या कधीकधी खूप दुःखी व्हायच्या. अशा परिस्थितीत शबाना आझमी यांनी एकदा प्रयोगशाळेत कॉपर सल्फेटचे सेवन केले होते. ट्रेनसमोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण एकदा त्यांचा जीव मित्राने तर एकदा शाळेच्या शिपायाने वाचवला.
शबाना आझमी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तुफान चर्चेत आल्या. काही मुलाखतींमध्ये त्यांनी स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत शबाना यांनी दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यासोबत असलेल्या नात्यावर वक्तव्य केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
शशी कपूर यांच्यावर देखील शबाना आझमी यांचं क्रश होतं. त्यानंतर शबाना आझमी यांच्या आयुष्यात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांची एन्ट्री झाली. पण तेव्हा जावेद अख्तर विवाहित होते. पण जावेद अख्तर यांच्या घटस्फोटानंतर दोघांनी लग्न केलं. पण लग्नानंतर शबाना आझमी यांनी मुलाला जन्म दिला नाही. शबाना आझमी लवकरच ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.