चिमुकलीला ओळखलंत का? 90 च्या दशकातील हिट नाव, दारुच्या व्यसनामुळे गमावलं सर्वकाही

या फोटोतील चिमुकलीला ओळखलंत का? नव्वदच्या दशकातील ती लोकप्रिय अभिनेत्री आहे. फिल्मी कुटुंबातून आलेल्या या चिमुकलीची सावत्र बहीण सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठी अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. बिग बॉस ओटीटी 2 मध्ये तिने भाग घेतला होता.

चिमुकलीला ओळखलंत का? 90 च्या दशकातील हिट नाव, दारुच्या व्यसनामुळे गमावलं सर्वकाही
चिमुकलीला ओळखलंत का? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 12:42 PM

मुंबई | 30 सप्टेंबर 2023 : या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमध्ये आईच्या कुशीत दिसणाऱ्या चिमुकलीला ओळखलंत का? ही चिमुकली नव्वदच्या दशकातील हिट हिरोइन आहे. तिने शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या मोठ्या कलाकारांसोबत ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. लहानपणापासूनच तिचं फिल्म इंडस्ट्रीशी कनेक्शन आहे. कारण तिचं संपूर्ण कुटुंबच फिल्मी विश्वातून आहे. फोटोतील या चिमुकलीने वयाच्या 17 व्या वर्षीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आणि अवघ्या दोन वर्षांतच म्हणजेच वयाच्या 19 व्या वर्षी ती इंडस्ट्रीतील स्टार अभिनेत्री बनली. आज तिची सावत्र बहीण बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्री आहे.

19 व्या वर्षी स्टार अभिनेत्री ठरणाऱ्या या चिमुकलीने वयाच्या 24 व्या वर्षापासूनच अचानक अभिनयापासून आणि चित्रपटांपासून दूर गेली. ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पूजा भट्ट आहे. बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली पूजा भट्ट गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आली. या शोमधून बाहेर पडल्यानंतर ती तिच्या करिअर आणि खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. पूजाने वडील महेश भट्ट यांच्या ‘डॅडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘दिल है की मानता नहीं’, ‘सडक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Pooja B (@poojab1972)

2003 मध्ये तिने मनीष मखिजाशी लग्न केलं होतं. त्यावेळी मनीष हा एक व्हिडीओ जॉकी होता. मात्र लग्नाच्या 11 वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या लग्नाबद्दलही पूजा बिग बॉसच्या घरात मोकळेपणे व्यक्त झाली होती. सहस्पर्धक बेबिका धुर्वेशी बोलताना ती म्हणाली, “आमच्यात सर्वकाही ठीक होतं. तरीसुद्धा कमतरतेची जाणीव व्हायची. आमच्यात असं काहीतरी नक्कीच होतं, ज्यामुळे नात्यात काहीच ठीक वाटत नव्हतं. अखेर तुम्ही स्वत:शी किती दिवस खोटे बोलू शकता. मला मूल हवं होतं. पण तेसुद्धा शक्य झालं नाही.”

सायरस ब्रोचा आणि घरातील इतर स्पर्धकांसोबत गप्पा मारताना पूजा म्हणाली होती, “मला दारुचं व्यसन होतं. ही बाब मी स्वत: स्वीकारली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीही प्रयत्न केले. अखेर वयाच्या 44 व्या वर्षी मला त्यातून बाहेर पडता आलं. लोक मला दारुडी म्हणायचे. तेव्हा मी त्यांना सांगायचे की मी दारुच्या व्यसनातून बाहेर पडतेय.”

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.