फोटोत दिसणारी ‘ही’ चिमुकली कोण? आज आहे १०० कोटींहून अधिक संपत्ती मालकीण
गडगंज श्रीमंत आहे ही फोटोत दिसणारी चिमुकली, बॉलिवूडच्या दोन प्रतिष्ठित कुटुंबासोबत फोटोत दिसणऱ्या चिमुकलीचं नातं...अभिनेत्री नसली तरी कमावते कोट्यवधींची माया, माहेर आणि सासर दोन्ही देखील गडगंज श्रीमंत, जगते रॉयल आयुष्य... सध्या सर्वत्र फोटोत दिसणाऱ्या चिमुकलीचा चर्चा...
मुंबई : 30 ऑक्टोबर 2023 : लहानपणाचं आकर्षण प्रत्येकाला असतं… लहान असताना आपण कसे होतो, आपल्याला काय आवडायचं… अशा अनेक गोष्टी आपल्याला आजी – आजोबा नाही तर, आई – वडील सांगत असतात. शिवाय लहानपणीचे फोटो पाहिल्यानंतर जुन्या आठवणी देखील ताज्या होतात. सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे देखील लहानपणीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सेलिब्रिटींमध्ये मोठे बदल झाल्यामुळे फोटोमध्ये कोण आहे, चाहत्यांना ओळखता येत नाही. आता देखील सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये एक चिमुकली आणि एक चिमुकला दिसत आहे. फोटोत दिसणारी ही दोन लहान मुलं आज प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत..
तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल फोटोमध्ये कोण आहे. फोटो दिसणारी चिमुकले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांची मुलं आहेत. बिग बी यांच्या मुलीचं नाव श्वेता बच्चन नंदा आहे तर, मुलाचं नाव अभिषेक बच्चन आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, श्वेता बच्चन नंदा अभिनेत्री नसल्या तरी कोट्यवधी रुपयांची माया कमावतात.
श्वेता बच्चन यांचं कपूर कुटुंबासोबत देखील खास कनेक्शन
श्वेता बच्चन यांचं फक्त बच्चन कुटुंबाशीच नाही तर कपूर कुटुंबाशीही देखील खास कनेक्शन आहे. श्वेता यांनी 16 फेब्रुवारी 1997 रोजी एस्कॉर्ट्स ग्रुपचे उद्योजक निखिल नंदा यांच्यासोबत लग्न केलं. निखिल नंदा हिंदी चित्रपट अभिनेते आणि निर्माता राज कपूर यांची मुलगी रितू नंदा आणि राजन नंदा यांचं पूत्र आहेत. श्वेता यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या दोन प्रतिष्ठित कुटुंबासोबत त्यांचं नातं आहे.
मल्टी टॅलेंटेड आहेत श्वेता बच्चन
श्वेता बच्चन नंदा डेली न्यूज एन्ड अॅनालिसिस आणि वोग इंडियासाठी स्तंभलेखक आहेत. पॅराडाईज टॉवर्स या सर्वाधिक विकल्या जाणार्या कादंबरीच्या लेखिका देखील आहेत. श्वेता यांनी टेलिव्हिजन जाहिरातींसाठी मॉडेल म्हणून देखील काम केले आहे. एवढंच नाही तर, 2018 मध्ये त्यांनी स्वतःचे फॅशन लेबल MXS लाँच केले आहे.
श्वेता बच्चन नंदा यांची संपत्ती
श्वेता बच्चन नंदा यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्याकडे तब्बल 15 मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे. म्हणजे श्वेता बच्चन नंदा यांच्याकडे तब्बल ११० कोटी रुपयांची संपत्ती आहे. श्वेता नंदा भारतीय पत्रकार, उद्योजिका, लेखिका आणि फॅशन डिझायनर आहे.