‘मृत्यूचा कोणता व्हिसा नसतो…’, सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचा कॅनडा कनेक्शन?

Salman Khan | सलमान खान याच्या घरावर गोळीबार... गोळीबाराचं कॅनडा कनेक्शन?, 'तो' म्हणाला होता, 'मृत्यूचा कोणता व्हिसा नसतो...', सर्वत्र खळबळ, रविवारी पहाटे सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा...

'मृत्यूचा कोणता व्हिसा नसतो...', सलमान खान याच्या घराबाहेरील गोळीबाराचा कॅनडा कनेक्शन?
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 1:19 PM

बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रे येथील घराबाहेर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आहे आहे. अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार कोणी आणि का केला? याबद्दल अद्याप काहीही कळू शकलेलं नाही. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज देखील लागल्या आहे. अशात सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराचा संबंध कॅनडाशी जोडला जात आहे. कारण पंजाबी गायक गिप्पी ग्रेव्हाल याच्या कॅनडा येथील घरी फायरिंग करण्यात आली होती. एवढंच नाहीतर, फेसबूकवरून देखील गिप्पी ग्रेव्हाल याला 2023 मध्ये धमकी देण्यात आली होती. ज्यामध्ये सलमान खान याच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला होता.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपमधून पाठवण्यात आलेल्या धमकीच्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की, ‘खूप सलमान भाई – सलमान भाई करत फिरत असतो… आता तुझा भाई देखील तुझा बचाव करु शकत नाही… दाऊद किंवा कोणी अन्य डॉन तुझी रक्षा करेल असं समजू नकोस…’

‘सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर तू जे काही बोलला आहेस, ते विसरता येणार नाही… याचा परिणाम तुला नक्कीच भोगावा लागले… तुला ज्या देशात पळून जायचं असेल तर जा… पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव मृत्यूला कधीच कोणता व्हिसा नसतो…’ असा इशारा गिप्पी ग्रेव्हाल याला देण्यात आला होता…

हे सुद्धा वाचा

कोण आहे सलमान खान याचा शत्रू?

तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यानेही सलमान खानला जीवेमारण्याची धमकी दिली आहे. मात्र, आजच्या गोळीबारामागे कोणाचा हात आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. यामागे कोण लोक आहेत? हा तपासाचा विषय आहे. या गोळीबाराची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही.

सलमान खान याच्या घरावर गोळीबार

अभिनेत्याच्या घराबाहेर गोळीबार करत आरोपी फरार झाले आहेत. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण पोलिसांना असे अनेक सीसीटीव्ही सापडले आहेत ज्यामध्ये दोन्ही आरोपी दिसत आहेत.

लॉरेन्स विश्नोई अँगलवरूनही पोलीस तपास सुरू

लॉरेन्स विश्नोई अँगलवरूनही पोलीस तपास सुरू झाला आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या संदर्भात झोन 9 डीसीपी कार्यालयात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या घरावर झालेल्या गोळीबारामुळे खळबळ माजली आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.