कॅन्सरचा सामना करणाऱ्या हिना खानचं टक्कल, पोस्ट करत म्हणाली…
Hina khan Bald Latest Post: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरचा सामना करतेय हिना खान, टक्कल पडल्यानंतर अभिनेत्रीने पोस्ट केलाय फोटो, म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हिना खान हिची चर्चा... सोशल मीडियाच्या माध्यमातून असते चाहत्यांच्या संपर्कात...
अभिनेत्री हिना खान तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरचा सामना करत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे घरा-घरात पोहोचलेली हिना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. हिनाने सोशल मीडियावर पोस्ट करत कॅन्सरचा सामना करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली. त्यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला. कॅन्सर झाल्याची घोषणा केल्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करत आहे. आता देखील हिने हिने काही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. ज्या तुफान व्हायरल होत आहे.
टक्कल पडल्यानंतर हिना खान हिने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामस्टोरीवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हिना हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये हीना खान हिने हिजाब घातला आहे. ज्यामध्ये फक्त अभिनेत्रीचा चेहरा आणि चेहऱ्यावर हस्य दिसत आहे.
दुसऱ्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हिना हिने स्वतःचा सेल्फी पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये ‘फ्रायडे वाईब्स…’ असं लिहिलं आहे. तर हिना हिचे बाल्ड लूकमधील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी हिना खान हिने इन्स्टाग्रामवर टक्कल करण्याचा व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओ पोस्ट करत हिना म्हणाली होती, ‘पिक्सी म्हणतेय आता बाय बाय…. आता वेळ आली आहे निरोप घेण्याची! चांगल्या दृष्टीकोनातून सर्वात कठीण टप्प्याला सामान्य बनवण्याचा प्रयत्न..’
View this post on Instagram
पुढे हिना म्हणाला, ‘महिलांनो कायम लक्षात ठेवा… आपली ताकतचं आपली शांती आणि धैर्य आहे… आपण विचार केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही… स्वतःवर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे.’ अभिनेत्री हिना हिच्या या पोस्टवर फक्त चाहत्यांनी नाही तर, सेलिब्रिटींनी देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला.
सांगायचं झालं तर, 28 जून रोजी हिना खान हिने कॅन्सर झाल्याची माहिती चाहत्यांना दिली. आयुष्यातील कठीण काळ असताना सुद्धा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना धैर्याने आणि आशावादाने सामना करत आहे. तेव्हापासून सर्वजण अभिनेत्रीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि ती लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.