Aishwarya Rai | भयानक लूक! ‘कान्स’च्या रेड कार्पेटवरील अजब लूकमुळे ऐश्वर्या राय जोरदार ट्रोल

ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. यावेळी तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या 2002 पासून दरवर्षी सहभाग घेतेय.

Aishwarya Rai | भयानक लूक! 'कान्स'च्या रेड कार्पेटवरील अजब लूकमुळे ऐश्वर्या राय जोरदार ट्रोल
Aishwarya Rai BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 8:38 AM

फ्रान्स : दरवर्षी पार पडणारा प्रतिष्ठित ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ हा बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या रेड कार्पेट लूकशिवाय अपुरा असल्याचं म्हटलं जातं. ऐश्वर्याला या फिल्म फेस्टिव्हलचं आमंत्रण आवर्जून दिलं जातं आणि दरवर्षी ती तिच्या आकर्षक लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधते. यंदासुद्धा ऐश्वर्याने कान्सच्या रेड कार्पेटवर हजेरी लावली. मात्र यावेळी तिचा लूक पाहून नेटकरी चांगलेच नाराज झाले आहेत. यावेळी ऐश्वर्याने तिच्या नेहमीच्या स्टाईलपेक्षा अत्यंत वेगळा ड्रेस परिधान केला होता. इतकंच नव्हे तर या ड्रेसमध्ये ती स्वत: अन्कम्फर्टेबल दिसत होती. म्हणून नेटकरी तिच्या लूकवर निराश झाले आहेत.

ऐश्वर्याने चंदेरी रंगाचा मोठा हुड असलेला काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. हा तिचा सिल्वर अँड ब्लॅक ड्रेस जणू एखाद्या फॉईलप्रमाणेच दिसत होता. ऐश्वर्या नेहमीच तिच्या हेअरस्टाइलमुळेही ट्रोलर्सच्या निशाण्यावर असते. कान्समध्येही तिने तिची नेहमीचीच हेअरस्टाइल ठेवल्याने नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. किमान यावेळी तरी हेअरस्टाइल बदलायला पाहिजे होती, असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला. फॅशन डिझायनर सोफीने ऐश्वर्याचा हा गाऊन डिझाइन केला होता. मात्र डोक्यावर इतक्या मोठी हुडी का दिली, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला. ‘भाभी, हा तुमचा घुंघट नाही’, अशीही खिल्ली काहींनी उडवली आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या काही वर्षांत ऐश्वर्या कोणत्याही पार्टीत, कार्यक्रमात किंवा सहज एअरपोर्टवर जरी दिसली तरी तिचा एकच लूक पहायला मिळाला. याआधीही बऱ्याच व्हिडीओंवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी ऐश्वर्यावर तिच्या हेअरस्टाइलमुळे निशाणा साधला आहे.

पहा फोटो-

पहा व्हिडीओ

ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचली आहे. यावेळी तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. या प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या 2002 पासून दरवर्षी सहभाग घेतेय. आजवर तिने या रेड कार्पेटवर अनेक लोकप्रिय फॅशन डिझायनर्सनी डिझाइन केलेले कपडे परिधान केले आहेत. ऐश्वर्यासाोबतच यावर्षी सारा अली खान, मानुषी छिल्लर, उर्वशी रौतेला यांचाही रेड कार्पेटवर जलवा पहायला मिळाला.

ऐश्वर्या नुकतीच ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटात झळकली होती. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात तिने दुहेरी भूमिका साकारल्या आहेत. जगभरात या चित्रपटाने 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.