Urvashi Rautela : आधी मगरीचा नेकलेस आता निळी लिपस्टीक… उर्वशी रौतेलाचा लूक पाहून अनेकांना आली ऐश्वर्याची आठवण

Cannes 2023 : कान्स फिल्म फेस्टिव्हल जगभरात प्रसिद्ध आहे. त्यात बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींनी सहभाग घेतला आणि अजूनही सुरूच आहे. उर्वशी रौतेलाही यात सहभागी झाली असून यावेळी ती पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसली.

Urvashi Rautela : आधी मगरीचा नेकलेस आता निळी लिपस्टीक... उर्वशी रौतेलाचा लूक पाहून अनेकांना आली ऐश्वर्याची आठवण
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 10:54 AM

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सध्या कान्स 2023 (Cannes 2023) मध्ये तिचा जलवा दाखवत आहे. नवनवे आणि अनोख्या लूकने ती सगळ्यांनाच तिचे फॅन बनवत आहे. अलीकडेच, तिने कान्सच्या रेड कार्पेटवर गळ्यात मगरीचा नेकलेस घातल्याने उर्वशी चर्चेत आली होती. आणि यातात तर या फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी तिने निळी लिपस्टीक लावल्याचे दिसून येत आहे. यामुळे तिची पुन्हा चर्चा सुरू झाली असून या लूकमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे.

76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी जेव्हा उर्वशी रौतेला तिच्या ग्लॅम लुकचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रोड कार्पेटवर पोहोचली तेव्हा तिचा लूक सर्वत्र चर्चेचा भाग बनला. उर्वशीने तिसऱ्या दिवशी निळा आणि पांढरा ऑफ शोल्डर प्रिन्सेस गाऊन निवडला. या गाऊनमध्ये तिने जबरदस्त पोजही दिल्या. पण तिच्या सुंदर पोशाखापेक्षा तिच्या इंक-ब्ल्यू रंगाच्या लिपस्टिकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

उर्वशी रौतेलाचे कान्समधील हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ही छायाचित्रे पाहून सोशल मीडियावर युजर्सच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. काही जण म्हणतात की उर्वशी रौतेला डिस्नेच्या खलनायिकेसारखी दिसत आहे. तर कोणी म्हणतं की अशा प्रकारे लिपस्टिक लावून ती ऐश्वर्या रायचा लूक कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे. “जेव्हा तुम्ही पेन चघळत असता आणि ते गळू लागते.” अशी कमेंटही एका यूजरने तिच्या फोटोवर केली आहे.

काही लोकांनी ती ऐश्वर्या रायला कॉपी करत असल्याचाही आरोप केला. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनही कान्समध्ये जांभळ्या रंगाची लिपस्टीक लावून आली होती. दुसर्‍याने लिहिले, “ती यावर्षीच्या कान्समध्ये ऐश्वर्याला कॉपी करत आहे का?” तर दुसर्‍याने टिप्पणी केली, “मी हे बोलत आहे यावर माझा विश्वास बसत नाही पण मला वाटते की ती या लूकमध्ये चांगली दिसत आहे.” एका यूजरने लिहिले की, “ती डिस्ने व्हिलनसारखी दिसते.” सर्वात शेवटी, दुसर्‍याने लिहिले, “ती अॅश सारखा तिचा लूक कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे.” काही युजर्स उर्वशीच्या समर्थनात आहेत आणि तिच्या लूकचे कौतुक करताना दिसले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.