Bigg Boss फेम एल्विश यादवची रेव्ह पार्टी; सापाचं विष, परदेशी मुलींचा पुरवठा आणि बरंच काही… गुन्हा दाखल
Bigg Boss | रेव्ह रार्टीमध्ये परदेशी मुलींचा पुरवठा आणि बरंच काही... बिग बॉस विजेता एल्विश यादव वादाच्या भोवऱ्यात... गुन्हा दाखल; पार्टीतील धक्कादायक गोष्टी चौकशीत समोर... सर्वत्र खळबळ... नक्की काय आहे सत्य... सर्वत्र चर्चांना उधाण
![Bigg Boss फेम एल्विश यादवची रेव्ह पार्टी; सापाचं विष, परदेशी मुलींचा पुरवठा आणि बरंच काही... गुन्हा दाखल Bigg Boss फेम एल्विश यादवची रेव्ह पार्टी; सापाचं विष, परदेशी मुलींचा पुरवठा आणि बरंच काही... गुन्हा दाखल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/11/Winner-Elvish-Yadav.jpg?w=1280)
मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरव गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने एल्विश यादव याच्यासोबत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एल्विश यादव त्याच्या साथीदारांसह नोएडामध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित करत असल्याची माहिती समोर येत आहे. एवढंच नाही तर, पार्टीमध्ये बंदी असलेल्या सापाच्या विषाचा वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती देखील समोर येत आहे. बिग बॉस विजेत्याच्या रेव्ह पार्टीमध्ये परदेशी मुलींना देखील बोलावण्यात यायचं… असे आरोप एल्विश यादव याच्यावर करण्यात आले आहे. ज्यामुळे एल्विश वादाच्या भोवऱ्यात अडकू शकतो..
मिळतअसलेल्या माहितीनुसार, पार्टीमध्ये पाच जणांना अटक केली असून पोलीस एल्विश यादव याची कसून चौकशी देखील करत आहेत. पीपल फॉर अॅनिमल्स या संस्थेचे गौरव गुप्ता यांनी गुन्हा दाखल केला आहे. यूट्यूबर एल्विश इतर सहकाऱ्यांसोबत नोएडाच्या फार्म हाऊसमध्ये सापांसोबत व्हिडिओ शूट करायचा असे आरोप यूट्यूबर करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा पोलिसांनी प्रतिबंधित सापाच्या विषाचा पुरवठा करणाऱ्या टोळीवर छापा टाकला होता आणि या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी एल्विश यादव यावर देखील अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाचे विष आणि परदेशी मुलींचा पुरवठा केल्याच्या आरोपांचा समावेश आहे. पोलिसांना अटक केलेल्या पाच जणांची सध्या चौकशी सुरु असून यामध्ये एल्विश यादव याचा देखील हात असल्याची माहिती मिळत आहे. एवढंच नाही तर, या टोळीच्या ताब्यात 9 साप आणि सापाचे विष सापडले आहे.
ज्यामध्ये 5 कोब्रा आणि बाकीचे विविध प्रजातीं सापांचे विष आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एल्विश यादव याचं नाव समोर आलं आहे. पण त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तर पकडलेले साप पोलिसांना वनविभागाच्या ताब्यात दिले आहेत. सध्या याप्रकरणी कसून चौकशी सुरु आहे.
रेव्ह पार्टीत एल्विश यादव याचं नाव समोर आल्यामुळे त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.