‘ती माझ्या बहिणी सारखी…’, कास्टिंग दिग्दर्शक क्रिती सनॉन हिच्याबद्दल असं काय म्हणाला?
क्रिती सनॉन हिला बहीण म्हणणार कास्टिंग दिग्दर्शक कोण? अभिनेत्रीसोबत असलेले वाद मिटवण्यासाठी त्याला लागले अनेक वर्ष.. आता मोठा खुलासा करत म्हणाला..., सध्या सर्वत्री क्रिती आणि दिग्दर्शकाच्या नात्याची चर्चा...
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. क्रिती हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. गेल्या 10 वर्षांपासून अभिनेत्र इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. क्रिती फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सांगायचं झालं तर, क्रिती हिचं नाव दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. पण पुढे त्यांच्या रिलेशनशिपबद्दल काहीही कळलं नाही. आता अभिनेत्री सिंगल असल्याची माहिती मिळत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी देखील क्रिती हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
माझ्या एका चुकीमुळे क्रिती हिच्यासोबत असलेल्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता... असं देखील दिग्दर्शक मुकेश छाब्रा म्हणाले. शिवाय झालेली चूक सुधारण्यासाठी दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांना अनेक गोष्टी कराव्या लागल्या… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त क्रिती आणि मुकेश यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.
आयुष्यात झालेल्या कोणत्या गोष्टीचा अधिक पश्चाताप होत आहे. यावर क्रिती हिचं नाव घेत मुकेश म्हणाले, ‘क्रिती माझ्या बहिणीसारखी आहे. माझ्या सख्या बहिणीपेक्षा देखील मी जास्त तिच्यावर प्रेम करतो. पण एकदा मी तिच्यासोबत खोटं बोललो होतो…’
‘जेव्हा त्या खोट्या गोष्टीबद्दल क्रिती हिला माहिती झालं तेव्हा वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. अशात आमचं नातं पुन्हा पुर्वी सारखं होण्यासाठी अनेक वर्ष लागले…’ असं देखली मुकेश म्हणाले. सध्या सर्वत्र मुकेश यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. मुकेश छाब्रा यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्यासोबत ‘दिल बेचारा’ सिनेमात कान केलं होतं. ‘दिल बेचारा’ हा सिनेमा सुशांत याचा अखेरचा सिनेमा ठारला. अभिनेत्याच्या निधनानंतर सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. तर मुकेश छाब्रा यांनी अनेक सिनेमांमध्ये कास्टिंग दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
क्रिती सनॉन हिच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच क्रिती अभिनेत्री करीना कपूर आणि तब्बू यांच्यासोबत ‘क्रू’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आली. आता अभिनेत्री ‘दो पत्ती’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात क्रिती हिच्यासोबत अभिनेत्री काजोल देखील असणार आहे.