रियाकडून सुशांतवर आध्यात्मिक उपचार, सीबीआय पंडित, पुजारी तांत्रिक-मांत्रिकांचीही बाजू तपासणार

रियानं सुशांतवर आध्यात्मिक उपचार करुन घेतले होते. त्याचाही सीबीआय तपास करत आहे (CBI investigating spiritual therapy over Sushant).

रियाकडून सुशांतवर आध्यात्मिक उपचार, सीबीआय पंडित, पुजारी तांत्रिक-मांत्रिकांचीही बाजू तपासणार
खरंतर, सुशांतच्या आत्महत्येवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. सुशांतने आत्महत्या केली होती की त्याची हत्या करण्यात आली यावर मोठा सस्पेन्स पाहायला मिळाला. सुशांतने आत्महत्या नाही तर त्याची हत्या करण्यात आली असं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
Follow us
| Updated on: Aug 24, 2020 | 10:42 PM

मुंबई : सुशांत सिंहच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी सीबीआयचे 16 अधिकारी मुंबईत तळ ठोकून आहेत. ते प्रत्येक अँगलनं तपास करतायत (CBI investigating spiritual therapy over Sushant). मात्र सर्वांचीच नजर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आहे. रियाला समन्स पाठवल्याचं सीबीआयकडून सांगण्यात येतंय. मात्र समन्स आलाच नसल्याचं रियाच्या वकिलांनी म्हटलंय. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सुशांत आणि रिया ज्या रिसोर्टमध्ये राहिले होते, तिथंही धडक दिली.

रियानं सुशांतवर आध्यात्मिक उपचार करुन घेतले होते. त्याचाही सीबीआय तपास करत आहे (CBI investigating spiritual therapy over Sushant). त्यासाठीच सीबीआय पथक वॉटरस्टोन रिसॉर्टपर्यंत पोहचलं आहे. लवकरच रियालाही याबाबत प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. अंधेरीतील वॉटर स्टोन रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांकडूनही माहिती घेतली जात आहे. मागील वर्षीच्या अखेरीस सुशांत सिंह आणि रिया या रिसॉर्टमध्ये राहिलेत. याच ठिकाणी रियानं सुशांतवर आध्यात्मिक उपचार केले. त्यामुळं या रिसॉर्टमध्ये त्या 2 महिन्यात नेमकं काय झालं? याचा तपास सीबीआयनं सुरु केलाय. त्यासाठीच रविवारीही सीबीआयचे अधिकारी या रिसॉर्टमध्ये आले होते.

आता पुन्हा सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी वॉटर रिसॉर्टच्या मॅनेजरचीही चौकशी केली. रियासोबत सुशांत कधी वॉटर स्टोन रिसॉर्टमध्ये आले? कोणत्या रुमची बुकिंग केली होती आणि भाडं किती होतं? आध्यात्मिक उपचारकर्ते मोहन जोशी किती वेळा आले? आणखी कोणी पंडित, पुजारी तांत्रिक मांत्रिक आले होते का? सुशांत मानसिक आजारी वाटत होता का? असे अनेक प्रश्न रिसॉर्टच्या मॅनेजरला विचारण्यात आले. 22 आणि 23 डिसेंबरला आध्यात्मिक उपचारकर्ते मोहन जोशींनी सुशांतवर वॉटप स्टोन रिसॉर्टमध्ये उपचार केले होते. रियानंच त्यांना फोन करुन बोलावलं होतं.

दिशा सालियानच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलवरुन इंटरनेट कॉलिंग, कॉल नेमके कोणी केले? तपास नाही

सीबीआय सुशांतच्या जवळील व्यक्तींची चौकशी करत आहे. त्यामुळं लवकरच रियाचीही सीबीआयकडून चौकशी सुरु होईल. रिया सीबीआयच्या मुख्य रडारवर असण्याचं कारण म्हणजे सुशांतच्या कुटुंबीयांकडून रियावर झालेले गंभीर आरोप. तिच्यावर सुशांतला कुटुंबीयांपासून दूर केल्याचा आरोप, सुशांतच्या पैशांवर मौजमजा केल्याचा, सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी ट्रान्सफर केल्याचा, सुशांतच्या विश्वासू कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याचा, सुशांतला मानसिक आजार असल्याचा कट कचल्याचा आणि सुशांतचा वापर करुन त्याला सोडून दिल्याचे आरोप आहेत.

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, कूक निरज सिंह आणि सुशांतचा केअर टेकर दीपेश सावंतचीही सीबीआय कसून चौकशी करत आहे. त्यामुळं सुशांत आणि रियाबद्दलची जवळपास संपूर्ण माहिती सीबीआयकडे जमा झालीय. सीबीआयची प्रश्नांची यादीही तयार आहे.

आता रियाला देखील अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. 8 जूनला असं काय झालं की सुशांतचं तुम्ही घर सोडलं? सुशांतच्या मानसिक आजाराबद्दल नेमकं सत्य काय आहे? सुशांत आत्महत्या करेल असं कधी वाटत होतं का? सुशांतच्या कंपनीत तुमची काय भागिदारी आहे? यूरोप टूरवरुन आल्यावर सुशांतला काय झालं होतं? सुशांतच्या कुटुंबीयांसोबत तुमचे संबंध कसे होते? अशा अनेक प्रश्नांना रियाला सामोरे जावे लागणार आहे.

याआधी ईडीकडून रियाची चौकशी झालीय. पण ईडी मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलनं तपास करतेय. तर सीबीआय सुशांतची हत्या झाली की आत्महत्या? याचा तपास करत आहे. यात रियाचा नेमका रोल काय? हाच महत्वाचा प्रश्न आहे.

संबंधित बातम्या :

सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप, संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर

Sushant Singh | फ्लॅटमधील घडामोडी ते रियासोबतचं नातं, सुशांतचा रुममेटवर सीबीआयकडून प्रश्नांची सरबत्ती

Sushant Singh Rajput Case Live | सिद्धार्थ, नीरज, रजत डीआरडीओ कार्यालयात, समोरासमोर बसवून सीबाआयकडून चौकशी

संबंधित व्हिडीओ :

CBI investigating spiritual therapy over Sushant

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.