AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप, संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर

करणी सेनेचा कार्यकर्ता सुरजित सिंह याने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र संदीप सिंह हाच खरा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला (CBI inquiry of Sandip Singh friend of Sushant).

सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप, संदीप सिंह सीबीआयच्या रडारवर
Follow us
| Updated on: Aug 24, 2020 | 12:09 AM

मुंबई : करणी सेनेचा कार्यकर्ता सुरजित सिंह याने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र संदीप सिंह हाच खरा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला (CBI inquiry of Sandip Singh friend of Sushant). यानंतर संदीप सिंह देखील आता सीबीआयच्या रडारवर आला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप सिंह अनेकदा कॅमेऱ्यासमोर दिसला. सुशांतच्या बहिणीसोबत तो रुग्णालयातही आला. त्यामुळे आता लवकरच सीबीआय संदीप सिंहची देखील चौकशी करण्याची शक्यता आहे.

संदीप सिंह सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरापासून रुग्णालयापर्यंत सुशांतची बहिण मितू सिंहसोबत दिसला. संदीप सिंहसोबतचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये संदीप, सुशांत आणि अंकिता लोखंडेही फोटो दिसत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतचं पार्थिव कूपर रुग्णालयात आणलं गेलं. तेव्हापासून ते पोस्टमार्टमपर्यंत संदीप सिंह कूपर रुग्णालयातच होता. मात्र, आता याच संदीप सिंहवर कुपूर रुग्णालयात उपस्थिती असलेला प्रत्यक्षदर्शी आणि करणी सेनेचा कार्यकर्ता सुरजित सिंहनं गंभीर आरोप केले आहेत. त्याने संदीप सिंह हाच या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप केलाय.

संदीप सिंह नेमका कोण आहे?

संदीप सिंह सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र आहे. सुशांत आणि संदीपनं एकत्र चित्रपट क्षेत्रात करियर सुरु केलं. गेल्या वर्षी आलेल्या पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा संदीप सिंह निर्माता आहे. सुशांतनं आत्महत्या केल्याचं समजताच संदीप घटनास्थळी आला आणि मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. सुशांतच्या कुटुंबीयांसोबत मृतदेह ताब्यात घेतानाही संदीप सिंह उपस्थित होता.

संदीप सिंह सुशांतचा मित्र असला तरी तो दीड वर्षांपासून सुशांतच्या संपर्कात नव्हता, अशीही माहिती समोर येतेय. पण ज्या पद्धतीनं संदीप सिंह, सुशांत सिंहची बहिण मितू सिंह यांच्यासोबत रुग्णालयात एकत्रच आला. त्यावरुन कुटुंबीय सुद्धा त्याला ओळखत असावेत असा अंदाज लावण्यात येत आहे. मात्र संदीप सिंह यांच्यावरही झालेले गंभीर आरोप पाहता लवकरच सीबीआयकडून त्याच्या चौकशीची दाट शक्यता आहे. सुशांतच्या मृत्यूपासून सोबत असणं असो की सुशांत आणि अंकितासोबतचे त्याचे फोटो, यामुळं तो सध्या सीबीआयच्या रडारवर आला आहे.

संबंधित बातम्या :

दररोज गांजाचे सेवन, फ्लॅटमध्ये भुताचा भास, सुशांतच्या कूककडून धक्कादायक खुलासे

Sushant Singh | फ्लॅटमधील घडामोडी ते रियासोबतचं नातं, सुशांतचा रुममेटवर सीबीआयकडून प्रश्नांची सरबत्ती

Sushant Singh Rajput | सुशांतच्या फलॅटसंदर्भात मालक संजय लालवानींची चौकशी

Sushant Singh Case | सुशांत आत्महत्याप्रकरणात सीबीआयकडून सीन रिक्रिएट, सिद्धार्थ पिठाणी, नीरज आणि दीपेशची तीन तास चौकशी

संबंधित व्हिडीओ :

CBI inquiry of Sandip Singh friend of Sushant

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.