AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rhea Chakraborty | रियासंबंधित खोटी माहिती देणाऱ्या शेजारणीला सीबीआयने फटकारले, डिंपल थवानी विरोधात तक्रार दाखल

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रियाने तिच्या विरोधात खोटी माहिती देणाऱ्या, शेजारी डिंपल थवानी हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Rhea Chakraborty | रियासंबंधित खोटी माहिती देणाऱ्या शेजारणीला सीबीआयने फटकारले, डिंपल थवानी विरोधात तक्रार दाखल
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 6:18 PM

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) जामीन मंजूर झाल्याने, ती सध्या घरी परतली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर रियाने तिच्या विरोधात खोटी माहिती देणाऱ्या, शेजारी डिंपल थवानी (Dimple Thawani) हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 13 जूनला रियाला सुशांतसोबत पाहिल्याचा दावा डिंपल थवानीने केला होता. (CBI warned Rhea Chakraborty neighbour Dimple Thawani not to lie)

आत्महत्येच्या आदल्या दिवशी म्हणजेच 13 जूनला सुशांत सिंह राजपूत रिया चक्रवर्तीला तिच्या घरी सोडण्यासाठी आला होता. आपण त्या दोघांना पाहिले होते, असे रियाच्या शेजारी राहणाऱ्या डिंपल थवानी (Dimple Thawani) हिने सांगितले होते. नुकताच सीबीआयकडून तिचा जबाब नोंदवण्यात आला. तर, डिंपलनेच ही खोटी माहिती माध्यमांना दिली असून, तिच्यावर कारवाई करण्यात यावी, असे तक्रारपत्र रिया चक्रवर्तीने सीबीआयला दिले आहे.

तर, दुसरीकडे रियाचे (Rhea Chakraborty) वकील सतिश मानेशिंदे यांनी देखील डिंपलवर प्रसिद्धीसाठी खोटे बोलण्याचा आरोप लावला आहे. 2 मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी डिंपल थवानीने खोटे वृत्त पसरवले, असे त्यांनी म्हटले आहे. ‘मी सुशांतची चाहती असून, मागच्या जन्मीपासूनचे आमचे नाते आहे. आम्ही सोलमेट होतो’, असा दावा डिंपल थवानीने केला होता. (CBI warned Rhea Chakraborty neighbour Dimple Thawani not to lie)

सीबीआय जबाबात तफावत

डिंपल थवानीने (Dimple Thawani) आधी बरेच दावे केले. परंतु, सीबीआयकडे जबाब नोंदवताना तिने आपण दोघांना पाहिले नाही, असे म्हटल्याचे कळते आहे. ‘मी सुशांत आणि रियाला पाहिले नव्हते, तर दुसऱ्या कोणीतरी त्या दोघांना एकत्र पहिले होते’, असे रियाच्या शेजारी राहणाऱ्या डिंपल थवानीने सीबीआयला सांगितले. तर, त्या व्यक्तीने दोघांना नेमके कुठे पाहिले होते, हे देखील आठवत नसल्याचे तिने म्हटले. या उडवाउडवीच्या उत्तरांमुळे सीबीआयने तिला चांगलेच फटकारल्याचे कळते आहे. ज्याचे पुरावे नाहीत, अशी खोटी माहिती देऊ नको, असा समज तिला देण्यात आला आहे.

डिंपल विरोधात रियाने दाखल केली तक्रार

एनसीबीने अटका केल्याने रियाला तब्बल 28 दिवस तुरुंगात काढावे लागेल. तीन वेळा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर न्यायालयाने चौथ्यावेळी तिचा जामीन अर्ज अखेर मंजूर केला. सध्या रिया (Rhea Chakraborty) तिच्या घरी परतली आहे. मात्र, यादरम्यान तिने तिच्याविरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करायला सुरुवात केली आहे. यात पहिले नाव डिंपल थवानीचे आहे. रियाने सीबीआयला तक्रार पत्र देत, तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संबंधित बातम्या : 

Rhea Chakraborty bail | तब्बल 28 दिवसानंतर रियाची सुटका, भायखळा तुरुंगाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त!

Rhea Chakraborty | रिया चक्रवर्ती ‘ड्रग्ज सिंडिकेट’मध्ये नाही; कोर्टाकडून दिलासा!

(CBI warned Rhea Chakraborty neighbour Dimple Thawani not to lie)

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.