तारक मेहताच्या ‘सोढी’च्या अपहरणाचे गूढ ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजमुळे वाढले, मुंबई नव्हे तर..
तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या कलाकारांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. गुरुचरण सिंग हा तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारत होता. त्याला आजही सोढी या नावानेच ओळखले जाते. गुरुचरण सिंगची सोशल मीडियावर चांगलीच फॅन फाॅलोइंग आहे.
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका केल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तारक मेहता मालिका जवळपास सर्वच वयोगटातील लोकांना आवडते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कलाकार हे मालिका सोडून जाताना दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तारक मेहता मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग याच्याबद्दल एक हैराण करणारी बातमी पुढे येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून गुरुचरण सिंग हा बेपत्ता आहे. हेच नाही तर तो आजारी असल्याचे देखील सांगितले जातंय.
आता गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाल्यानंतर तक्रार देखील दाखल करण्यात आलीये. पोलिस हे गुरुचरण सिंगचा शोध घेत आहेत. यादरम्यानच एक अत्यंत हैराण करणारा असा सीसीटीव्ही हा पुढे आलाय. या सीसीटीव्हीमुळे मोठी खळबळ ही बघायला मिळत आहे. या सीसीटीव्हीमध्ये गुरुचरण सिंग हा दिसत आहे. हेच नाही तर तो दिल्लीमध्ये दिसत आहे.
सकाळी आठचे मुंबईला जाण्याचे फ्लाइट देखील गुरुचरण सिंगने पकडले नसल्याचे सीसीटीव्हीमधून सिद्ध झाले. हेच नाही तर 24 एप्रिलपर्यंत गुरुचरण सिंगचा फोन देखील सुरू होता, मात्र आता त्यानंतर फोन देखील बंद येतोय. सीसीटीव्हीमध्ये गुरुचरण सिंग हा स्पष्ट दिसत आहे. गुरुचरण सिंग याचे अपहरण केल्याची शंका उपस्थित केली जातंय.
हेच नाही तर जो सीसीटीव्ही पुढे आलाय, त्यामध्ये गुरुचरण सिंग हा रस्त्याच्याकडेने चालताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून गुरुचरण सिंगचे तब्येत खराब असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार देखील सुरू होते. गुरुचरण सिंग सध्या आरामच करत होता. आता या प्रकरणात पोलिसांकडून काही मोठे खुलासे हे केले जाऊ शकतात. या प्रकरणातील शोध सध्या सुरू आहे.
मुंबईला न जाता अभिनेता दिल्लीमध्येच काय करत होता आता हा प्रश्न उपस्थित केला जातोय. हेच नाही तर पोलिसांच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागल्याचे देखील सांगितले जातंय. सोढीच्या भूमिकेतून गुरुचरण सिंगने एक वेगळीच ओळख मिळवली होती. मात्र, गुरुचरण सिंगने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली. गुरुचरण सिंगची मोठी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.