सेलिब्रिटींची दाढी, कटिंग… केस कापण्यासाठी बिग बी, रजनीकांतसह हे स्टार्स मोजतात मोठी रक्कम
'या' सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्टची केस कापण्याची फी 1 लाखाच्या पुढे, तिन्ही खान गेल्या अनेक वर्षांपासून त्याचे लॉयल कस्टमर... बिग बी, रजनीकांतसह हे स्टार्स मोजतात मोठी रक्कम... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्टची चर्चा...
सेलिब्रिटी कायम त्यांच्या लूकसाठी लाखो रुपये खर्च करतात. फिटनेस आणि सौंदर्य याला सेलिब्रिटी कायम प्राधान्य देतात. बॉलिवूडमध्ये प्रत्येक सेलिब्रिटींचे स्टायलिस्ट आहेत. जे सेलिब्रिटींना परफेक्ट लूक देतात. पण झगमगत्या विश्वात असा एक सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट आहे, ज्याच्याकडे भारतातील अनेक सेलिब्रिटी केस कापण्यासाठी येत असतात. लोकं असं विचार देखील करतात की, सेलिब्रिटींचे केस कोण कापत असेल. त्यांना वेगळा आणि हटके लूक कोण देत असेल… केस कापण्यासाठी त्यांनी किती पैसे मोजावे लागत असतील… असं अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले असतात.
रिपोर्टनुसार, भारतातील अनेक सेलिब्रिटी आणि बॉलिवूड, क्रिकेट विश्वातील अनेक सेलिब्रिटींचा हेअर स्टायलिस्टची आलिम हकीम आहे. आलिम हकीम याच्याकडून केस कापण्यासाठी सेलिब्रिटी किती पैसे मोजतात याचा खुलासा खुद्द सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्टनेच केला आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आलिम हकीम याने मोठा खुलासा केला आहे. सेलिब्रिटींचे केस कापण्यासाठी आलिम हकीम कमीत कमी 1 लाख रुपये फी घेतो. त्यानंतर पुढे सेलिब्रिटींच्या इच्छेनुसार हेअर स्टाईल ठरते… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आलिम हकीम याची चर्चा रंगली आहे.
आलिम हकीम याने ‘कबीर सिंग’ सिनेमासाठी शाहिद कपूर, ‘सॅम बहादूर’ सिनेमासाठी अभिनेता विकी कौशल, ‘ऍनिमल’ सिनेमासाठी रणबीर सिंग आणि बॉबी देओल यांना देखील हटके लूक दिला होता… अभिनेत्याच्या हेअर स्टायलिस्टची चर्चा देखील तुफान रंगली…
सांगायचं झालं तर, आलिम हकीम याने सुपरस्टार रजनीकांत, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे देखील केस कापले आहे. आलिम म्हणतो, ‘जवळपास 98 टक्के भारतीय सिनेमांमधील भूमिकांसाठी मीच स्टाईल करतो.’ अलिम हकीम यांच्याकडे हेअर कटिंगसाठी 1 लाख रुपयांपासून सुरुवात होते. त्यानंतर 10 ते 15 लाख रुपयांपर्यंत आलिम याची फी आहे. हे सर्वात कमी चार्च आहे…
आलिम म्हणतो, ‘अभिनेता सलमान खान, फरदीन खान, सुनील शेट्टी, अजय देवगन माझ्याकडे गेल्या 20 वर्षांपासून येत आहेत. आज देखील अनेक सेलिब्रिटी माझ्याकडून हेअर स्टाईल करुन घेतात. एवढंच नाही तर, क्रिकेटपटू विराट कोहली देखील आलिम याच्याकडून हेअर स्टाईल करुन घेतो…