त्याने मला प्रायव्हेट पार्ट दाखवले, पण चुकी मात्र…, शिक्षकांनीही ठरवलं ‘या’ कारणांमुळे अभिनेत्रीला जबाबदार
Kolkata Doctor Case: पुरुषांनी अत्याचार केल्यानंतर तरुणी, महिलांना ठरवलं जातं जबाबदार! प्रसिद्ध अभिनेत्री लहानपणी तिच्यासोबत घडलेलं कृत्य सांगत म्हणाली, 'त्याने मला प्रायव्हेट पार्ट दाखवले, पण चुकी मात्र...', अखेर अभिनेत्रीने केली हक्काची मागणी...
कोलकात्यामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सेलिब्रिटी देखील त्यांच्यावर झालेले अत्याचार सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आता वेळ एकत्र येण्याची आहे… असं म्हणत आहे. शिवाय वाईट घटना घडल्यानंतर चुकी फक्त पीडिताची असते… असं देखील अनेकदा सांगितलं जातं… यावर अभिनेत्री सेलिना जेटली हिने स्वतःच्यासोबत घडलेल्या घटना सांगितल्या आहे. जेव्हा अभिनेत्री फक्त सहावी इयत्तेत होती.
शनिवारी शाळेतील एक फोटो पोस्ट करत सेलिना जेटली म्हणाली, ‘प्रत्येक वेळी पीडिताची चुकी मानली जाते. फोटोमध्ये मी सहावी इयत्तेत होती. तेव्हा काही कॉलेजमधील मुलं माझी शाळा सुटण्याची प्रतीक्षा करत बाहेर उभे असायचे… ते रोज माझ्या रिक्षाचा पाठलाग करायचे…’
‘काही दिवसांनंतर माझं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी माझ्या रिक्षावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. पण तेथे उपस्थित असलेल्या कोणी काहीही बोललं नाही. यासाठी मला माझ्या शिक्षकांनी खूप सुनावलं. माझे शिक्षक मला म्हणाले, ‘माझ्यासोबत असं झालं कारण मी सैल कपडे घालत नाही. केसांना तेल लावत नाही. वेण्या घालत नाही…ही माझी चुकी आहे…’ यासाठी अनेक वर्ष मी स्वतःला दोषी मानत होती..’
View this post on Instagram
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘सकाळी शाळेत जाण्यासाठी रिक्षासाठी थांबायची तेव्हा तेव्हा एक व्यक्तीने पहिल्यांदा मला त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवले होते… अनेक वर्ष मी ती घटना विसरली नव्हती. शिक्षकांनी सांगितल्या माझ्या चुकांनी माझ्या मनात घर केलं होतं.’
अभिनेत्री 11 वी असताना देखील तिला मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचा सामना करावा लागला होता. ‘मला आजही आठवत आहे माझ्या स्कूटीची तार कोणी तोडली होती. कारण मी कॉलेजमधील काही मुलांना प्रतिक्रिया देत नव्हती. तेव्हा त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं आणि माझ्या स्कूटीवर काही घाणेरड्या नोट्स ठेवल्या होत्या..’
‘माझ्यासोबत घडलेली सर्व घटना एका मुलाने शिक्षकांना सांगितली. माझ्या शिक्षकांचा मला फोन आला आणि त्या मला म्हणाल्या तू एक फॉरवर्ड मुलगी आहेस. स्कूटी चालवते, केस मोकळी सोडते… वर्गात जीन्स घालून येते… त्यामुळे मुलांना वाटतं तुझे कॅरेक्टर वाईट असेल… तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी मी स्कूटीवरून उडी मारली…’
‘मला खूप जखमी होती, तरी देखील चूक माझी होती. मला शारीरिक आणि मानसिक दुखापत झाली होती, पण ती माझी चूक होती असे मला सांगण्यात आलं. माझे सेवानिवृत्त कर्नल आजोबा, ज्यांनी आपल्या देशासाठी दोन युद्धे लढली होती, त्यांनी मला शाळेत सोडायला सुरुवात केली. ज्यांनी माझा पाठलाग केला ते उद्धट मुले मला अजूनही आठवतात. माझ्या निवृत्त कर्नल आजोबांची खिल्ली उडवताना त्यांनी अपमानास्पद टिप्पणी केली.’
स्वतःसोबत झालेल्या अत्याचारानंतर अभिनेत्री सेलिना जेटली हिने महिलांची सुरक्षा आणि हक्कांची मागणी केली आहे. ‘ही आपला हक्क मागण्याची वेळ आहे… यात आमचा दोष नाही…’ असं देखील सेलिना जेटली म्हणाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.