‘रॉकी और रानी..’मधील ममता बॅनर्जी, ब्रा, ओल्ड माँकसह ‘या’ सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री

यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबतच धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी आणि आमिर बशीर या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने जवळपास सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलं आहे. हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

'रॉकी और रानी..'मधील ममता बॅनर्जी, ब्रा, ओल्ड माँकसह 'या' सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 4:47 PM

मुंबई | 23 जुलै 2023 : करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी निर्मात्यांनी या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडे पाठवलं आहे. सेन्सॉर बोर्डाने रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटातील काही सीन्स आणि डायलॉग्सवर कात्री चालवल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटातील काही आक्षेपार्ह शब्द, एका दारुच्या ब्रँडचं नाव आणि त्याचसोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाशी संबंधित एक संपूर्ण डायलॉग हटवण्यास सांगितलं आहे. हे संबंधित बदल केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं आहे. हे बदल नेमके कोणते आहेत, ते पाहुयात..

  1. चित्रपटातील बऱ्याच सीन्समध्ये एका शिवीचा वापर करण्यात आला आहे. त्या शिवीला बदलून ‘बहन दी’ असा शब्द वापरला गेला आहे. यातील एका सीनमध्ये ‘ओल्ड माँक’ या रम ब्रँडचा उल्लेख आहे. त्याचं नाव बदलून ‘बोल्ड माँक’ असं ठेवलंय. याआधी सेन्सॉर बोर्डाने शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘स्कॉच’ या शब्दाला बदलून त्याऐवजी ‘ड्रिंक’ असा शब्द वापरण्यास सांगितलं होतं.
  2. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मधील एका डायलॉगमध्ये ‘लोकसभा’ असा शब्द वापरला आहे. त्याच्या जागी दुसरा कोणताही शब्द न वापरता थेट तो डायलॉग कापण्यात आला आहे.
  3. या चित्रपटात रवींद्रनाथ टागोर यांच्याशी संबंधित एक सीन होता. हा सीन ट्रेलरमध्येही पहायला मिळाला होता. या सीनमधील एका शब्दाला काढून त्या जागी एखादा फिल्टर टाकण्यास सांगितलं गेलंय. रवींद्रनाथ टागोर यांचा चित्रपटातील उल्लेख तसाच आहे की काढलाय हे मात्र अस्पष्ट आहे.
  4. चित्रपटातील एका डायलॉगमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा उल्लेख आहे. कारण चित्रपटात आलिया एका बंगाली कुटुंबातील मुलगी दाखवण्यात आली आहे. मात्र ममता बॅनर्जी यांच्याशी संबंधित संपूर्ण डायलॉग चित्रपटातून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
  5. रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात एक सीन लॉन्जरी शॉपचा आहे. या सीनमधील एक डायलॉग हा महिलांसाठी अपमानकारक असल्याचं म्हणत सेन्सॉर बोर्डाने हटवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे या सीनमध्ये ‘ब्रा’ या शब्दाऐवजी तिथे ‘आयटम’ असा शब्द वापरण्यास सांगितलं आहे. हा संपूर्ण डायलॉग नेमका काय आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होऊ शकेल.

या सर्व बदलांनंतर सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिलं आहे. या प्रमाणपत्रानुसार हा चित्रपट 168 मिनिटं म्हणजेच 2 तास 48 मिनिटांचा आहे. यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंगसोबतच धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी आणि आमिर बशीर या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने करण जोहरने जवळपास सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पुनरागमन केलं आहे. हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हे सुद्धा वाचा

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.