अश्लीलता पसरवणाऱ्या OTT प्लॅटफॉर्मची आता खैर नाही, केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर, थेट जेलपासून ते..

कोरोनानंतरच्या काळापासून लोक हे चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये न जाता ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिक बघत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मकडे लोकांचा कल वाढल्याचे सातत्याने बघायला मिळतंय. लोक ओटीटी प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर सतत करताना दिसत आहेत. मात्र, तिथे अश्लीलता पसरवली जात आहे.

अश्लीलता पसरवणाऱ्या OTT प्लॅटफॉर्मची आता खैर नाही, केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडवर, थेट जेलपासून ते..
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 2:57 PM

मुंबई : अश्लीलता आणि हिंसाचार पसरवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मला मोठा झटका मिळणार आहे. अश्लीलता पसरवणारे ओटीटी प्लॅटफॉर्म आता थेट केंद्र सरकारच्या निशाण्यावर आहेत. यामुळेच यांचे धाबे दणाणल्याचे बघायला मिळतंय. या संदर्भातली कठोर कायद्या आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. इतकेच नाही तर तशा हालचाली देखील दिल्लीमध्ये सुरू आहेत. थेट येत्या अधिवेशनात या संदर्भातील विधेयक हे मांडले जाणार आहे. फक्त हेच नाही तर चार डझन ओटीटी प्लॅटफॉर्म हे सरकारी यंत्रनेच्या रडारवर आहेत. काहींना तर थेट नोटीस देखील पाठवण्यात आलीये.

म्हणजे काय तर पुढील काही दिवसांमध्येच ओटीटी प्लॅटफॉर्म संदर्भात देशात एक कायदा कडक होताना दिसणार आहे. त्यामध्येच राहून ओटीटी प्लॅटफॉर्मला काम करावे लागले. इतकेच नाही तर त्या नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जेलची हवा देखील खावी लागणार आहे. तीन ओटीटी प्लॅटफॉर्मला थेट नोटीस देखील पाठवण्यात आल्याचे सांगितले जातंय.

गेल्या काही वर्षांपासून स्पेशली कोरोनानंतरच्या काळापासून ओटीटी प्लॅटफॉर्म चर्चेत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अश्लीलता पसरली जातंय. यामुळे आता नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. काही ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लील चित्रपट आणि वेब स्टोरी या चालवल्या जात आहेत. हे अतिशय गंभीर आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालय IT नियम 2021 च्या कलमानुसार 67 आणि 67A अंतर्गत अश्लील सेवा देणाऱ्या OTT प्लॅटफॉर्म विरुद्ध कारवाई करेल. इतकेच नाही तर, हंटर्स, बेशरम आणि प्ले ओटीटी या प्लॅटफॉर्मला अश्लील गोष्टी काढून टाकण्यासाठी निर्देश देण्यात आले. फक्त हेच नव्हे तर त्यांच्यावर कारवाई देखील केली जातंय.

जर एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यांच्या अश्लील श्रेणीत येणारा मजकूर हा काढून टाकला नाहीतर त्यांच्यावर थेट आयटी नियमांच्या कलमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. फक्त कारवाईच नाही तर दंडासह थेट 10 वर्ष जेलमध्ये राहण्याची तरतूद देखील आहे. यामुळे आता काही ओटीटी प्लॅटफॉर्मचे धाबे दणाणल्याचे स्पष्टपणे बघायला मिळत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.