‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; 11 वर्षांपासूनच्या नात्याची नवी सुरुवात

चक दे इंडिया या चित्रपटातील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं होतं. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर चित्राशी लग्नगाठ बांधणार आहे.

'चक दे इंडिया' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; 11 वर्षांपासूनच्या नात्याची नवी सुरुवात
Chak De IndiaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 2:59 PM

मुंबई: शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटात बऱ्याच अभिनेत्रींनी भूमिका साकारल्या होत्या. हॉकीच्या टीममधील खेळाडूंची भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रींना चित्रपटातून बरीच प्रसिद्धी मिळाली. त्यापैकीच एक आहे अभिनेत्री चित्राशी रावत. चक दे इंडिया या चित्रपटातील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं होतं. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. यामागचं कारण म्हणजे ती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 11 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर चित्राशी लग्नगाठ बांधणार आहे.

चक दे इंडियानंतर चित्राशीने ‘FIR’ सारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेत तिने इन्स्पेक्टर ज्वालामुखी चौटालाची भूमिका साकारली होती. आता ती बॉयफ्रेंड ध्रुवादित्य भगवानानीशी लग्नगाठ बांधण्यासाठी सज्ज झाली आहे.

हे सुद्धा वाचा

चित्राशीचा मेहंदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतील तिच्या मित्रमैत्रिणींनीही हजेरी लावली होती. डेलनाज इराणी, सयांतनी घोष, श्रुती उल्फत यांसारख्या सेलिब्रिटींनी चित्राशीच्या मेहंदी कार्यक्रमाचे फोटो शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Chitrashi Rawat (@chitrashi)

चित्राशी आणि ध्रुवादित्य यांचं लग्न छत्तीसगडमधील बिलासपूर इथं पार पडणार आहे. “आम्हाला देहरादूनमध्ये कोर्ट मॅरेज करायचं होतं. आम्ही ठरवलं होतं की साध्या सोप्या पद्धतीने लग्न करूयात, पैसे वाचवुयात आणि त्या पैशातून ट्रॅव्हल करुयात. मात्र कुटुंबीयांनी लग्नसोहळा आयोजित करण्यासाठी आग्रह धरला. ध्रुव आणि मी या लग्नसोहळ्याकडे एक सोहळा म्हणून नाही तर कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत केलेला उत्सव म्हणून पाहतोय”, असं चित्राशी तिच्या लग्नाबद्दल म्हणाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.