Chandan Prabhakar: चंदन प्रभाकर यापुढे ‘कपिल शर्मा शो’ करणार नाही, ‘या’ कारणासाठी दिला नकार
चंदन म्हणाला, “होय, मी द कपिल शर्मा शोच्या आगामी सीझनचा भाग नसणार आहे. मात्र त्याने शो सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले नाही. केवळ मला फक्त ब्रेक घ्यायचा होता असे त्याने सांगितले." चंदनच्या या विधानावरून तो या शोचा भाग होणार नाही हे स्पष्ट झाले आहे, पण कपिल शर्मासोबतच्या मतभेदावर त्याने मौन बाळगले आहे.
टीव्ही इंडस्ट्रीत कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show )लोकप्रिय आहे. ‘द कपिल शर्मा शो’ तिसऱ्या सीझनसाठी सज्ज झाला आहे. येत्या 10 ऑक्टोबरपासून हा शो सोनी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. यावेळी शोमध्ये अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. मात्र या शोमधून सातत्याने एक चेहरा गायब असणार आहे. जो सुरुवातीपासून या कार्यक्रमाशी जोडला गेला होता. तो म्हणजे ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये विविध भूमिका साकारणारा अभिनेता चंदन प्रभाकर(Chandan Prabhakar) होय. मात्र आताच्या तिसऱ्या सीझनमध्ये चंदन दिसणार नसल्याचे समोर आले आहे.केवळ चंदन प्रभाकरच नाही तर भारती सिंग (Bharti Singh) आणि कृष्णा अभिषेक देखील यावर्षी कपिल शर्माच्या शोचा भाग असणार नाहीत.
चंदन शोचा भाग होणार नाही ?
ऑनलाइन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘द कपिल शर्मा शो’ ने पुष्टी केली आहे, की चंदन प्रभाकर कॉमेडियन कपिल शर्माच्या शोच्या आगामी सीझनचा भाग होणार नाही. चंदन आणि कपिल शर्मा एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतात आणि दोघांचे एकमेकांशी घट्ट नाते होते. मात्र चंदनबद्दल बोलायचे झाले तर, कपिल शर्मासोबतचे मतभेद हे हा शो सोडण्यामागचे मुख्य कारण असल्याचे वर्तवले जात आहे. रिपोर्टनुसार, जेव्हा चंदन प्रभाकरला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, तो कपिल शर्मा शोचा आगामी सीझन करत नाही हे खरे आहे का? त्यावेळी त्याने होकार देत, चंदन म्हणाला, “होय, मी द कपिल शर्मा शोच्या आगामी सीझनचा भाग नसणार आहे. मात्र त्याने शो सोडण्यामागचे कारण स्पष्ट केले नाही. केवळ मला फक्त ब्रेक घ्यायचा होता असे त्याने सांगितले.” चंदनच्या या विधानावरून तो या शोचा भाग होणार नाही हे स्पष्ट झाले आहे, पण कपिल शर्मासोबतच्या मतभेदावर त्याने मौन बाळगले आहे.
भारती सिंह आणि कृष्णा अभिषेक नसणार …
केवळ चंदन प्रभाकरच नाही तर भारती सिंग आणि कृष्णा अभिषेक देखील यावर्षी कपिल शर्माच्या शोचा भाग असणार नाहीत. कृष्णा अभिषेक या शोमध्ये सहभागी न होण्याचे कारण करार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कृष्णा यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.के भारती सिंह म्हणाली होती की, मी छोट्या ब्रेकवर आहे आणि मी आता सारेगमप देखील करत आहे. मी कपिल शर्मा शो करणार नाही असे नाही, पण सध्या मी नियमित नसणार आहे.