Gulabo sitabo च्या ओटीटी रिलीजनंतर आयुष्यमान खुराणाचा चित्रपट आता थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) गुलाबो सिताबो (Gulabo Sitabo) हा चित्रपट नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

Gulabo sitabo च्या ओटीटी रिलीजनंतर आयुष्यमान खुराणाचा चित्रपट आता थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 12:53 PM

मुंबई : आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) गुलाबो सिताबो (Gulabo Sitabo) हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. मात्र, ओटीटीवर हा चित्रपट विशेष जादु करू शकला नाही. आयुष्मान खुरानाने चंदीगड करे आशिकी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. दोन महिन्यांपूर्वी आयुष्मानने या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले होते. चंदीगड करे आशिकीच्या शूटिंगनंतर वाणी कपूरने शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता या चित्रपटाविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Chandigarh Kare Aashiqui movie will be screened in theaters)

आयुष्मान खुरानाचा अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेला चित्रपट गुलाबो सिताबो हा ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. त्यामधून काही खास कमाई झाली नाही. त्यानंतर आता त्याने निर्णय घेतला आहे की, तो आपला आगामी चित्रपट चंडीगड करे आशिकी थिएटरमध्ये प्रदर्शित करणार आहे. चंदीगड करे आशिकी’चं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीमनं धमाल पार्टी केली. वाणीनं पार्टीचे काही फोटो शेअर केले होते, या फोटोमध्ये वाणी, आयुष्मान आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर केक कापताना दिसत होते.

वाणीनं ‘या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं होत त्यावेळी तिने फोटो शेअर करताना लिहिले होते की, मी या टीमला खूप मिस करणार.’ आयुष्माननं चित्रीकरणाच्या सुरुवातीला वाणी कपूर आणि दिग्दर्शक अभिषेकसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानं फोटो शेअर करत, ‘नेक्स्ट स्टॉप- माझे होमटाउन चंदीगड.’ असं कॅप्शन दिलं होतं. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार अभिषेक कपूर केदारनाथ चित्रपटानंतर सुशांतसिंग राजपूतला चंडीगड करे आशिकी या चित्रपटासाठी घेणार होता. तसे सुशांत आणि अभिषेकमध्ये बोलणेही झाल्याचे समजते. पण कदाचित नशिबाला आणखी काहीतरी वेगळेच मंजूर होते. चंदीगड करे आशिकी चित्रपटात सुशांतच्या जागी आयुष्मान खुरानाने काम केले आहे.

संबंधित बातम्या : 

‘केजीएफ 2’ चा जबरदस्त टीझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांची उत्सुकता शिगेला…!

So Expensive | सोनाक्षी सिन्हाने घातला एवढा महागडा ड्रेस, किंमत ऐकून विश्वास नाही बसणार…!

(Chandigarh Kare Aashiqui movie will be screened in theaters)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.