विशाल पांडेवर भडकली वडापाव गर्ल, म्हणाली, अरमान मलिकने जे केले ते…
बिग बॉस ओटीटी 3 हे सध्या चांगलेच चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटी 3 मध्ये मोठे धमाके होताना दिसत आहेत. विकेंडच्या वारला बिग बॉसच्या मंचावर विशाल पांडे याचे आई आणि वडिल आले होते. मात्र, ज्यापद्धतीने ते मुलाची बाजू घेऊन बोलताना दिसले ते प्रेक्षकांना अजिबातच आवडले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
बिग बॉस ओटीटी 3 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटी 3 ची चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळतंय. आता बिग बॉस ओटीटी 3 मधून चंद्रिका दीक्षित अर्थात वडापाव गर्ल ही बाहेर पडलीये. विकेंडच्या वारला अनिल कपूर यांनी चंद्रिकाला चांगलेच फटकारले होते. हेच नाहीतर तिचा स्वत:चा मुद्दा नसल्याने ती दुसऱ्यांच्या मुद्दात उडी मारते असेही अनिल कपूर यांनी म्हटले. चंद्रिका दीक्षित ही बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर घरातील काही सदस्य हे भावूक झाले. बिग बॉसच्या घरात चंद्रिका दीक्षित ही विशाल पांडे याची माफी मागताना दिसली.
आता चंद्रिका दीक्षित ही बाहेर आलीये आणि तिने विशाल पांडेवर जोरदार टीका केली. हेच नाहीतर अरमान मलिक याने जे काही केले ते योग्यच असल्याने तिने म्हटले आहे. चंद्रिका दीक्षित म्हणाली की, ज्यावेळी विशालचे आई वडिल बिग बॉसच्या मंचावर आले आणि ते ज्यापद्धतीने रडत होते तर मला वाटले की, कदाचित मी चुकीचे केले.
मी त्यानंतर माफी देखील मागितली. परंतू आता मी तो कटारिया आणि विशाल पांडे यांचा व्हिडीओ बघितला. मी एक मुलगी असल्यामुळे मला स्पष्ट समजले की, विशाल कोणत्या पद्धतीने कृतिका मलिकबद्दल बोलला. अत्यंत चुकीच्या आणि वाईट पद्धतीनेच विशाल बोलला आहे. जे खूप म्हणजे खूप जास्त चुकीचे होते.
अरमान मलिक याच्याऐवजी माझा पती घरात असता आणि माझ्याबद्दल कोणी अशी घाणेरडी कमेंट केली असती तर त्याने गाडले असते. त्या तुलनेत अरमान मलिक याने तर फक्त आणि फक्त विशालच्या कानाखालीच मारली. आता चंद्रिका दीक्षित हिने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा ही सतत रंगताना दिसत आहे.
चंद्रिका दीक्षित ही बिग बॉसमध्ये चांगला गेम खेळताना दिसली. मात्र, कमी मत असल्याने तिला बिग बॉसच्या घरातून बेघर व्हावे लागले. चंद्रिका दीक्षित हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विकेंडच्या वारमध्ये शिवानी हिला देखील खडेबोल सुनावताना अनिल कपूर हे दिसले. शिवानी नेहमीच घरातील सदस्यांसोबत कारण नसताना देखील भांडताना दिसते.