अमिताभ बच्चन यांच्या पाया पडताना दिसली वडापाव गर्ल, ‘ते’ फोटो व्हायरल, म्हणाली, माझ्यासाठी…
बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त असा चाहतावर्ग बघायला मिळतो. काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन अमिताभ बच्चन हे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. विशेष म्हणजे हे सीजन चांगलेच चर्चेत देखील आहे.
चंद्रिका दीक्षित ऊर्फ वडापाव गर्ल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. वडापाव गर्ल ही बिग बॉस ओटीटी सीजन 3 मध्ये पोहोचली होती. विशेष म्हणजे सुरूवातीच्या काळात वडापाव गर्ल ही धमाकेदार गेम बिग बॉसच्या घरात खेळताना दिसली. मात्र, त्यानंतर तिचा गेम म्हणावा तसा चांगला राहिला नाही आणि ती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. वडापाव गर्ल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सोशल मीडियावर कायमच तिचे फोटो आणि व्हिडीओ बघायला मिळतात. वडापावच्या गाडीमुळे ती रातोरात स्टार नक्कीच झालीये. लोक तिला चंद्रिका दीक्षित नव्हे तर वडापाव गर्ल याच नावाने ओळखतात.
वडापाव गर्ल ही आता बिग बॉसनंतर थेट काैन बनेगा करोडपतीच्या सेटवर पोहोचली आहे. वडापाव गर्ल हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवरून हे स्पष्ट होत आहे की, ती आता काैन बनेगा करोडपतीच्या सेटवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे तिने थेट अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे खास फोटो शेअर केले.
वडापाव गर्ल हिने दोन फोटो शेअर केले. त्यामधील एका फोटोमध्ये वडापाव गर्ल ही अमिताभ बच्चन यांच्या बाजूला उभी दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ती अमिताभ बच्चन यांच्या पाया पडताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत वडापाव गर्लने खास कॅप्शन देखील शेअर केले आहे. वडापाव गर्ल हिने म्हटले की, अमिताभजी यांना भेटण्याचे भाग्य मिळाले.
सोशल मीडियावर वडापाव गर्ल हिचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये ती काैन बनेगा करोडपतीच्या सेटवर पोहोचल्याचे दिसत आहे. अमिताभ यांना भेटल्यानंतर वडापाव गर्ल ही भावूक होताना दिसत आहे. हेच नाही तर हात जोडून ती काहीतरी बोलताना दिसत आहे. वडापाव गर्ल ही फक्त सेटवर पोहोचली की, ती गेम खेळताना दिसणार याबद्दल काही कळू शकले नाहीये.
अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सेटवरील काही खास फोटो शेअर केले होते. यासोबतच त्यांनी भावनिक पोस्टही लिहिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून काैन बनेगा करोडपतीच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहेत.