मंत्रांचा जप अन् अझानचा आवाज एकत्रितपणे..; सोनाक्षी-झहीरच्या लग्नात नेमकं काय घडलं?

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नात नेमकं काय-काय घडलं, हे सांगणारी पोस्ट या दोघांच्या एका खास मैत्रिणीने लिहिली. यासोबतच तिने लग्नाचा व्हिडीओसुद्धा पोस्ट केला आहे. झहीर आणि सोनाक्षी हे 23 जून रोजी लग्नबंधनात अडकले.

मंत्रांचा जप अन् अझानचा आवाज एकत्रितपणे..; सोनाक्षी-झहीरच्या लग्नात नेमकं काय घडलं?
सोनाक्षीच्या लग्नातील खास क्षणImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 10:44 AM

वडील शत्रुघ्न सिन्हा यांची नाराजी, भाऊ लव सिन्हाची गैरहजेरी या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर अखेर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न पार पडलं. हे दोघं गेल्या सात वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र सोनाक्षीच्या आंतरधर्मीय लग्नाबाबत तिचे कुटुंबीय फारसे खुश नसल्याचं समोर येतंय. अशातच या सोनाक्षी आणि झहीर यांची खास मैत्रीण प्राची मिश्राने लग्नातील प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट नेटकऱ्यांना सांगितली आहे. बाहेर कितीही चर्चा होत असली तरी दोघांनी पाहुण्यांचं स्वागत खूप चांगल्या प्रकारे केलं आणि संपूर्ण सोहळा अत्यंत खास पद्धतीने पार पडल्याचं ती म्हणाली.

प्राचीने सोशल मीडियावर लग्नाचा आतापर्यंत न पाहिलेला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये सोनाक्षी आणि झहीर त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या दिवशी भावून होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे हनी सिंगच्या गाण्यांवर ते थिरकतानाही दिसले. या व्हिडीओसोबत लिहिलेल्या पोस्टमध्ये प्राचीने लग्नातील बारकावे सांगितले आहेत. ‘ज्या जमान्यात लग्नासाठीची प्रत्येक गोष्ट खरेदी केली जाते किंवा दुसऱ्यांकडून डिझाइन केली जाते, तिथे आम्हाला सोना आणि झहीरकडून खास व्हॉइस मेसेज आणि व्हिडीओ कॉल आला. या लग्नातील प्रत्येक गोष्ट जुन्या काळाप्रमाणे अत्यंत खासगी होती. लग्नाच्या एक रात्र आधी आम्ही मुलाच्या पक्षाकडून होतो, तेव्हा त्याच्यासोबत चांगला वेळ घालवला. नंतर लग्नाच्या दिवशी आम्ही मुलीच्या पक्षाने आलो. मीडियामुळे बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं पण आमची ब्लॉकबस्टर जोडी या सर्वांपासून खूप लांब होती. त्यांनी आम्हा सर्वांचा पाहुणचार खूप चांगला केला’, असं तिने लिहिलं.

हे सुद्धा वाचा

सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाबद्दल तिने पुढे सांगितलं, ‘या लग्नाची सुरुवात नोंदणी पद्धतीने झाली. त्यानंतर हिंदू विवाहपद्धतीनुसार कन्यादान पार पडलं. हा सोहळा अधिक पवित्र तेव्हा झाला जेव्हा मंत्रांचा जप आणि मशिदीतील अझानचा आवाज दैवी रुपाने एकरुप झाले. प्रेमाचा सर्वांवर विजय होतो, असं फक्त ऐकलं होतं. पण या दोघांकडे पाहून त्यावर विश्वास झाला.’

सोनाक्षी आणि झहीर हे 23 जून 2024 रोजी लग्नबंधनात अडकले. नोंदणी पद्धतीने लग्नानंतर दोघांनी भव्य रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला सलमान खान, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, सायरा बानू, रेखा यांसारखे बरेच सेलिब्रिटी उपस्थित होते.

आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.