“मला मारलं, शिवीगाळ केली”; सुष्मिता सेनच्या भावावर चारूचे गंभीर आरोप

राजीव सेनला चारू देणार घटस्फोट; दुसऱ्यांदा संधी देऊनही बदलला नाही स्वभाव?

मला मारलं, शिवीगाळ केली; सुष्मिता सेनच्या भावावर चारूचे गंभीर आरोप
चारू असोपा, राजीव सेनImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 25, 2022 | 4:12 PM

मुंबई- टेलिव्हिजनवरील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी राजीव सेन (Rajeev Sen) आणि चारू असोपा (Charu Asopa) यांनी पुन्हा एकदा विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी घटस्फोटाबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दोघांच्या नात्यात पुन्हा दरी निर्माण झाल्याने आता घटस्फोटाच्या (Divorce) निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे. राजीव हा बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ आहे.

राजीव सेन आणि चारू असोपा यांनी 2019 मध्ये लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर लगेचच या दोघांच्या नात्यात विविध समस्या निर्माण होऊ लागल्या. विभक्त होण्यापूर्वी पुन्हा एकदा एकमेकांना संधी देण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. मात्र त्याचाही काही परिणाम झाला नाही. त्यामुळे आता दोघंही घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम आहेत. चारूने पुन्हा एकदा राजीवपासून विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

हे सुद्धा वाचा

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत चारू याविषयी मोकळेपणे व्यक्त केली. “कोणीही जाणूनबुजून संसार मोडण्याचा निर्णय घेत नाही. मला माझ्या निर्णयाचा पश्चात्ताप करायचा नाही. या संसाराला वाचवण्यासाठी मी हरएक प्रयत्न केले आहेत. कारण हे माझं दुसरं लग्न होतं. आम्ही एकमेकांसाठी बनले आहोत, असं मला वाटायचं. पण हा संसार कधीच टिकू शकणार नाही”, असं चारू म्हणाली.

राजीवला घटस्फोट देण्याबाबत ती पुढे म्हणाली, “लग्नानंतर आमच्यात खूप भांडणं होऊ लागली. प्रत्येक भांडणानंतर राजीव काही आठवड्यांसाठी तर कधी महिनाभरासाठी गायब असायचा. त्याच्याशी संपर्क करण्याचे सर्व माध्यम तो बंद करायचा. लॉकडाऊनच्या काही दिवस आधी त्याने मला तीन महिन्यांसाठी एकटं सोडलं होतं. मुलीच्या जन्मानंतर गोष्टी बदलतील अशी मला अपेक्षा होती. पण दुर्दैवाने असं काहीच झालं नाही.”

या मुलाखतीत चारूने राजीवविरोधात मारहाणीचे आरोप केले. “त्याने अनेकदा शिवीगाळ केली. एक-दोनदा त्याने माझ्यावर हातदेखील उचलला होता. मी त्याची फसवणूक करतेय, असा त्याला संशय होता”, असं चारूने सांगितलं. या सर्व कारणांमुळे अखेर राजीवला घटस्फोट देत असल्याचं चारूने जाहीर केलं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.